Leopard Rescue  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Rescue : विहिरीत पडलेला बिबट्या वन विभागाकडून जेरबंद

Leopard Terror : बिजोटे (ता. बागलाण) येथील गायधरा शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात येतात ग्रामस्थांनी खाट विहिरीत सोडत बिबट्याचे प्राण वाचवले.

Team Agrowon

Nashik News : बिजोटे (ता. बागलाण) येथील गायधरा शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात येतात ग्रामस्थांनी खाट विहिरीत सोडत बिबट्याचे प्राण वाचवले. सटाणा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.

बिजोटे येथील शेतकरी जगन्नाथ बच्छाव यांच्या विहिरीतील विद्युत पंप सुरू करायला गेले असता त्यांना विहिरीत आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आत बिबट्या पडल्याचे दिसले. सरपंच पोपट जाधव यांना याबाबत भ्रमणध्वनीवर माहिती दिली. जाधव यांनी तत्काळ सटाणा वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

ग्रामस्थांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली होती. बिबट्या विहिरीच्या पाण्यात तरंगत असताना ग्रामस्थांना दिसल्याने ग्रामस्थांनी तातडीने खाट दोरीच्या साह्याने विहिरीत सोडत बिबट्याला बाजेवर बसवून ठेवले व पाण्यात बुचकळत असलेल्या बिबट्याला जीवदान दिले.

सटाणा वन विभागाचे वनपाल प्रभाकर पवार, नामदेव बदादे, हरीश चव्हाण, गौतम पवार, पंकज गुंजाळ, रामदास रौंदळ, योगेश माळी व किरण भामरे दाखल झाले. वन कर्मचाऱ्यांनी गर्दीला शांत करीत बिबट्याला वाचवण्यासाठी विहिरीत शिडी सोडली.

मात्र बिबट्या शिडीकडे आला नाही. बऱ्याच वेळानंतर वन कर्मचाऱ्यांनी किकवारी येथे लावलेला पिंजरा आणून विहिरीत सोडला. त्यात बिबट्या अडकला. त्याला वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याची तपासणी करून पुन्हा अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. वन विभागाला अनेक वेळा याबाबत माहिती देण्यात आली आहे. या परिसरात अनेक पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. वन विभागाने मुक्त संचार करणाऱ्या उर्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा.
- पोपट जाधव, सरपंच-बिजोटे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT