Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : लातूर, धाराशिवला अग्रिम विमा भरपाई नाही

Advance Crop Insurance : पंतप्रधान पिकविमा योजनेत पिकांच्या संभाव्य नुकसानीसाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीनुसार (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) पंचवीस टक्के आगाऊ (अग्रिम) भरपाई देण्याची तरतूद आहे.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : पंतप्रधान पिकविमा योजनेत पिकांच्या संभाव्य नुकसानीसाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीनुसार (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) पंचवीस टक्के आगाऊ (अग्रिम) भरपाई देण्याची तरतूद आहे. यानुसार गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली.

यंदा मात्र ही भरपाई लातूर व धाराशिव जिल्ह्याला मिळणार नाही. पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दिल्यामुळे पंचनाम्यानुसारच शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे.

लातूरला पीकविमा भरलेल्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक तर धाराशिवला चार लाख ७५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या आहेत.

दुष्काळ संहिता २०१६ नुसार तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील तीन ते चार आठवड्यांचा खंड पडल्याने एकूण पावसाचे झालेले कमी प्रमाण, तापमानातील असाधारण घट किंवा वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत), पावसातील असाधारण कमी किंवा जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा पिकांवरील प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव), इतर नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती आदी कारणांमुळे पेरणीच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्यास अशा प्रातिनिधिक सूचनांनुसार आगाऊ भरपाई देण्याची तरतूद पंतप्रधान पीकविमा योजनेत आहे.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. २०२१ मध्ये, तर २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड होता. यामुळे दोन वर्षांत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून २५ टक्के भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले होते.

सॅम्पल सर्वे, शासकीय यंत्रणाचा अहवाल, उपग्रह छायाचित्र, इस्त्रो व सॅक, एमएनसीएफसी, पीक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञांचे नियमित अहवाल, वर्तमान प्रसिद्ध बातम्यांवरून जिल्हाधिकारी ही अधिसूचना काढतात. यंदा शेतकऱ्यांनी स्वतःहूनच मोठ्या संख्येने नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यामुळे मध्यहंगाम परिस्थितीनुसार आगाऊ भरपाई देण्याचा विषय पुढे आला नाही. पूर्वसूचनांनुसार विमा कंपनी व कृषी विभागाने पंचनामे केले असून, त्यानुसार शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळणार आहे.

धाराशिव चार लाख ७५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या आहेत. यामुळे यंदा मध्यहंगाम प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना काढली नाही. पंचवीस टक्के आगाऊ विमा भरपाईबाबत कंपनीकडून मागील सात वर्षांतील सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येते. विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के भरपाई मिळत नाही. पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरही विम्याची भरपाई मिळत नाही. यामुळे पंचवीस टक्के आगाऊ विमा भरपाई शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत परवडणारी नाही. सरसकट शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई मिळते, एवढाच काय तो फायदा आगाऊ पीकविम्याची आहे.
- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव
लातूर जिल्ह्यात पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या आहेत. ४६ मंडलांत सर्वाधिक सूचना असून, कमी सूचना असलेल्या मंडळातही सॅम्पल सर्व्हे करून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे आगाऊ विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. दोन वर्षांत पावसाचा खंड होता. यामुळे आगाऊ पीकविम्याची अधिसूचना काढली होती. जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा निकष लागू पडतो. यामुळे नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानुसार पंचनामे झाले असून शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळू शकते.
- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture : अल्पभूधारकाने मिळवली दर्जेदार चॉकी निर्मितीत ओळख

Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

Flower Market : फुलांच्या आकर्षक हारांसाठी प्रसिध्द सुपे बाजार

Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लस ठरणार मैलाचा दगड

Mango Cashew Insurance : तीनशे आंबा-काजू बागायदार विमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT