Lok Sabha  Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : मतदान केंद्रांच्या पुर्नरचनेसाठी हरकतींचा आज अखेरचा दिवस

Latest Marathi News : आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांची माहिती तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयात आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. यावर हरकती अथवा सूचना नोंदविण्यासाठी सोमवारी (ता. ९) अखेरचा दिवस आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघ असून एकूण ८ हजार १७५ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांची पुनर्रचना करताना काही मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर काही मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत, तर काही मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या १ हजार ५०० पेक्षा जास्त झाल्याने त्यातील काही मतदारांना शेजारच्या खोलीतील केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, विभाग, भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्रांच्या यादीस मान्यता घेणे सुरू आहे.

त्यानुसार २१ विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रांचा प्रस्तावित बदल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावित मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या मार्गदर्शक सूचना मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रारूप मतदार यादी ५ जानेवारीपर्यंत :

विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी येत्या २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या अनुषंगाने दावे व हरकती २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबरपर्यंत दाखल करता येणार आहे. तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT