landslide in Karul Ghat Agrowon
ॲग्रो विशेष

Karul Ghat Landslide: करूळ घाटात दरड कोसळली

Sindhudurg Rain News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद पडला असून अनेक भागांत पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील अनेक मार्गांवरून पुराचे पाणी वाहत आहे. काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर रात्री अडीच वाजल्यापासून संततधार सुरू आहे. करूळ घाटात सोमवारी (ता. १६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दगड मातीचा मोठा भराव रस्त्यावर कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे घाटरस्त्याच्या दुतर्फा वाहनांचा मोठ्या रांगा लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडून दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तेरेखोल, गड, जानवली, शुक, शांती, भंगसाळ यासह सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तेरेखाल नदीचे पाणी आज सकाळी बांदा बाजारपेठेत पुराचे पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांची ताराबंळ उडाली.कणकवली-आचरा मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरीली वाहतूक ठप्प झाली. कणकवली तालुक्यातील हळवल-शिवडाव मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरीली वाहतूक देखील ठप्प झाली आहे.जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांतील सर्व सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे पडझडीचे अनेक प्रकार झाले आहेत.संततधारेसह काही भागात वाऱ्याचा वेग देखील आहे. वाऱ्यांमुळे घरे, गोठ्यांवर झाडे पडून अनेकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

देवगड ७०

मालवण ८२

सावंतवाडी १३२

वेंगुर्ला १२९

कणकवली ८४

कुडाळ ११३

वैभववाडी १२२

दोडामार्ग १४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT