Land Acquisition  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : तळेरे-करूळ महामार्ग भूसंपादनावरून जमीनमालक आक्रमक

Highway Work : तळेरे-करूळ या महामार्गावरील नाधवडे, कोकिसरे, वैभववाडी, एडगाव आणि करूळ या गावांतील जमिनीचे भूसंपादन न करताच महामार्गाचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : तळेरे-करूळपर्यत सुरू असलेल्या महामार्गाच्या भुसंपादनावरून पाच गावांतील जमीनमालक काल (ता. ७) आक्रमक झाले.जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संपादित न झालेल्या जमिनीत काम करू नये अशी भूमिका जमीनमालकांनी घेतली.

दरम्यान एक महिन्यात कागदपत्रांची पडताळणी करून पुढील निर्णय घेऊ असे प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तळेरे-करूळ या महामार्गावरील नाधवडे, कोकिसरे, वैभववाडी, एडगाव आणि करूळ या गावांतील जमिनीचे भूसंपादन न करताच महामार्गाचे काम सुरू आहे.

या संदर्भात आज (ता. ७) येथील तहसिल कार्यालयात महसुल, राष्ट्रीय महामार्ग, आणि जमीनमालकांची सयुंक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.

तळेरे-कोल्हापुर महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गाचे भूसंपादन झालेले नसताना या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे ज्या जमिनीचे भूसंपादन झालेले आहे.त्याच जमिनीत रस्त्याचे काम करावे.

ज्या जमिनीचे भूसंपादन झालेले नाही त्या जमिनीत काम करू नये अशी आक्रमक भूमिका जमीनमालकांनी मांडली. महामार्ग प्रधिकरणकडुन मनमानी सुरू आहे.भूसंपादन झालेली कोणतीही कागदपत्रे नाहीत त्यामुळे काम थांबवा अशी मागणी देखील करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी श्री.कातकर यांनी तळेरे-करूळ पर्यतचे भूसंपादन झालेले आहे. नव्याने ६.३६ हेक्टर भूसंपादनाचा प्रस्ताव आला असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जमीनमालकांनी भूसंपादन केलेल्या कागदपत्रांची मागणी केली.

यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या भुसंपादनाविषयीची कागदपत्रे रत्नागिरी आणि गगनबावडा येथे आहेत का याची पडताळणी करण्यात येईल.त्याकरिता महिनाभराचा वेळ द्या असे आवाहन केले. त्यानंतर पुन्हा बैठक घेवुन पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT