Tribal Land Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Land : आदिवासींच्या जमिनींवर भूमाफियांकडून अतिक्रमण

Land Encroachment : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती पेल्हारअंतर्गत येणाऱ्या वाकनपाड्यातील आदिवासी बांधवांच्या न्यायप्रविष्ट जमिनींवर भूमाफियाद्वारे अतिक्रमण सुरू आहे; मात्र पेल्हार प्रभागाचे सहायक आयुक्त भूमाफियांची पाठराखण करीत आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे.

Team Agrowon

Land Mafia : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती पेल्हारअंतर्गत येणाऱ्या वाकनपाड्यातील आदिवासी बांधवांच्या न्यायप्रविष्ट जमिनींवर भूमाफियाद्वारे अतिक्रमण सुरू आहे.

मात्र पेल्हार प्रभागाचे सहायक आयुक्त भूमाफियांची पाठराखण करीत आहेत, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. याबाबत अखिल भारतीय किसान सभेने पालिका मुख्यालयावर आंदोलन केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदिवासी जागेवरील या मुख्य प्रश्नासह जनतेच्या विविध प्रलंबित समस्या या वेळी प्रशासनापुढे मांडण्यात आल्या.

या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष गणेश दुमाडा, तालुका सहसचिव विद्याधर हरवटे, तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, सदस्य मनोज गुप्ता, देवराम पाटील तसेच समाजसेवक अंकित तिवारी, नीतेश अंधेर आदींसह जागामालक अरुणा चिमडासह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.

पेल्हार प्रभाग क्षेत्रातील वाकन पाडा परिसरात भूमाफियांमार्फत आदिवासी जमनींवर अतिक्रमण सुरू आहे. याबाबत आदिवासी बांधवांनी सहायक आयुक्त मनाली शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या.

उपायुक्त (अतिक्रमण) अतिरिक्त आयुक्तांचीही भेट घेऊन अतिक्रमण निदर्शनास आणून दिले; आतापर्यंत ‘कारवाई करतो’ या आश्वासनापलीकडे ठोस कारवाई झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT