Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : मशागतीला वेग; कापूस लागवडीची लगबग

Kharif Season 2025 : शेतात कामासाठी मजुरांप्रमाणे ट्रॅक्टरची टंचाई आहे. गिरणा, तापी नदीकाठी ही समस्या अधिक आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शेतीकामांना मजूरटंचाईचा फटका बसत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी शेत तापू दिले किंवा दोन-तीन महिन्यांपूर्वी क्षेत्र रिकामे केले होते, त्या शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीस वेग दिला आहे. यात ट्रॅक्टर मशागतीसाठी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

शेतात कामासाठी मजुरांप्रमाणे ट्रॅक्टरची टंचाई आहे. गिरणा, तापी नदीकाठी ही समस्या अधिक आहे. कारण विविध गावांत वाळू वाहतूक, माती वाहतूक, वाळू चोरीसाठी लहान, अल्पभूधारक शेतकरी पुढे पीक लागवडीचे नियोजन करीत आहेत.

खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. यामुळे कापूस लागवडीची तयारीदेखील कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी गावोगावी करीत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी पूर्वी बैलजोडीचा उपयोग अधिकचा करायचे. परंतु अलीकडे ट्रॅक्टर व अन्य यंत्रणा आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने शेतकरी मशागत करून घेत आहेत.

केळी, कापूस लागवडीचे नियोजन कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात केळी, कापूस व अन्य भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अनेक जण गादीवाफे तयार करून घेत आहेत. नंदुरबारात केळी, मिरची, कारली, टोमॅटो व अन्य पिकेही असतात. या पिकांच्या लागवडीची तयारी या भागात झाली आहे.

जूनमध्ये लागवडीचे नियोजन

खानदेशात कापूस, केळी, मिरची आगाप लागवड केली जात होती. परंतु उष्णता आता अधिक आहे. त्यात पुढे आणखी वाढीचे संकेतही आहेत. यामुळे शेतकरी सध्या शेत लागवडीसाठी तयार करून घेत आहेत.

अनेकांनी गादीवाफ्यांवर मिरची व अन्य पिकांसाठी पॉली मल्चींगदेखील टाकून घेतले आहे. १ जून किंवा ५ जूनपर्यंत त्यात लागवड केली जाईल. कापसाची लागवडदेखील अनेक जण १ जूननंतर करतील, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Management: पाण्याबरोबर मातीचाही ताळेबंद महत्त्वाचा...

Agricultural Technology: कृषी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरविद्याशाखीय गटकार्याची गरज

Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय

Jackfruit Farming: संत्रा पट्ट्यात फणसाचा प्रयोग

Agriculture Crisis: शेतीला गरज सर्वंकष पुनर्रचनेची!

SCROLL FOR NEXT