Soybean Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Harvesting : सोयाबीन काढणीसाठी मजूरांची टंचाई

Labor Shortage : दसरा, दिवाळीची चाहूल आणि ऑक्‍टोबर महिना अर्धा होत असताना आता सर्वत्र शेतशिवारात सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : दसरा, दिवाळीची चाहूल आणि ऑक्‍टोबर महिना अर्धा होत असताना आता सर्वत्र शेतशिवारात सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली आहे. यंदा उशिरा आलेल्या पावसाने पेरण्याही विलंबाने झाल्या. थोड्याफार प्रमाणात सोयाबीन सोंगणीला उशिरा सुरुवात झाली. परंतु, त्‍यातही शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईची मोठी समस्‍या निर्माण झालेली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ऑगस्‍ट महिन्‍यामधील पावसाच्‍या खंडामुळे सोयाबीन पिकावर मोठा फरक पडला असून, यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व मंडलांत सोयाबीनच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.

पावसाच्‍या या कालखंडात सोयाबीनची फूलगळ झाली. तसेच काही भागात पिवळा मोझॅकचा प्रादुर्भावही झाला. यामुळे सोयाबीनच्‍या शेंगा कमी प्रमाणात भरल्‍याचे वास्‍तव आहे. जिल्‍ह्यात एकूण खरीप हंगामाच्‍या तुलनेत ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे आहे.

शेतकऱ्यांनी महिनाभरापूर्वीच मजुरांना पैसे देऊन ठेवलेले असल्‍याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. परंतु, तरी सुद्धा एकाच वेळी सर्वत्र सोयाबीन काढण्याची लगबग सुरू झाल्‍याने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीन सोंगणीसाठी मजूर सापडणे कठीण झाले आहे. यासाठी शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंबीयसुद्धा शेतात राबत असल्‍याचे देखील चित्र आहे.

बाहेर राज्‍यातील मजुरांना मागणी

एकाच वेळी जिल्‍ह्यात सर्वत्र सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाल्‍याने लगतच्‍या मध्य प्रदेशातून मजूर सोयाबीन सोंगणीसाठी आणले जात आहेत. या मजुरांना वाहतुकीसह सर्व सोयीसुविधा द्याव्या लागतात. दुसरीकडे सोयाबीनचा उतारा अवघा पाच ते सहा क्विंटलदरम्यान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT