Soybean Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Harvesting : सोयाबीन सोंगणीला मिळेनात मजूर

Soybean Production : अमरावतीच्या बहुतांश भागात सोयाबीन सोंगणीकरीता मजुरांच्या शोधात वणवण भटकंतीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Team Agrowon

Amravati News : सोयाबीनवर कीडरोगांचा प्रादुर्भाव होत असून, काही भागात पीक संकटात आले आहे. तर, दुसरीकडे कीडरोगांपासून वाचलेल्या सोयाबीनच्या सोंगणीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

जिल्ह्याच्या काही भागात मेळघाटातील मजुरांचा सोयाबीन सोंगणीला आधार ठरतो. परंतु यंदा राज्याच्या ज्या भागात मजुरी जिकडे अधिक तिकडे मजूर जात असल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.

राज्याच्या इतर भागात मजुरांच्या उपलब्धतेची अडचण जाणवेल, परंतु अमरावती जिल्ह्यात आजवर ती तितकीशी जाणवत नव्हती. त्यामागे मेळघाट तसेच लगतच्या मध्य प्रदेशातून होणारी मजुरांची उपलब्धता हे कारण होते.

हे मजूर कुटुंबीयांसह येत असल्याने शेतात त्यांच्या निवाऱ्याची सोय केली की झाले, अशी स्थिती होती. यंदाच्या हंगामात मात्र सोयाबीन सोंगणीकरीता मजुरांच्या शोधात वणवण भटकंतीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मेळघाटातील कोरकू आदिवासींची मजूर टोळी सोंगणीकामी या भागात राहते. गेल्या हंगामात सोयाबीन सोंगणीचे दर २२०० ते २३०० रुपये होते.

यंदा मात्र राज्याच्या काही भागात ३००० रुपये प्रती एकरापेक्षा अधिक दर मिळत असल्याने हे आदिवासी मजूर अशा भागात जाण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी अमरावतीच्या बहुतांश भागात या मजुरांची उपलब्धताच होत नसल्याचे सांगितले जाते.

परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याच कारणामुळे दर्यापूर तालुक्‍यातील काही गावांमध्ये एकरी २८०० ते ३००० रुपये असा दर आहे. यामुळे उत्पादकता खर्च वाढला असताना दुसरीकडे बाजारात आर्द्रता अधिक असल्याचे कारणामुळे सोयबीनला कमी दर मिळत आहे. यामध्ये शेतकरी मात्र पिचला गेला असून शासनाने अशावेळी बाजारात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांच्यामधून होत आहे.

गेल्या हंगामात २२०० ते २३०० रुपये एकर असा सोयाबीन सोंगणीचा दर होता. यंदा मात्र २८०० ते ३००० रुपयांची मागणी होत आहे. मात्र त्यानंतरही मजूर मिळत नाही, अशी स्थिती आहे. सोयाबीनचे व्यवस्थापन आणि मजुरीवरच इतका खर्च होत असताना बाजारात दर मात्र दबावात आहेत. शेतकऱ्यांसाठी ही विरोधाभासी परिस्थिती फार अडचणीची ठरत आहे. शासनाने हस्तक्षेप करून संरक्षण देण्याची गरज आहे.
- विठ्ठलराव काळे, चांदई, ता. दर्यापूर, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT