Hunger Strike  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Ring Road : रिंगरोडप्रश्नी कृषी युवा क्रांती संघटनेचे उपोषण सुरू

Land Acquisition : शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला दिला जात नसून तो मोबदला कमी दराने दिला आहे.

Team Agrowon

Pune News : खेड तालुक्यातील पुणे चक्राकार महामार्गाच्या संपादनामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला दिला जात नसून तो मोबदला कमी दराने दिला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संपादित जमिनीचा जादा दराने मोबदला द्यावा, यासाठी रिंगरोड विरोधी प्रति समितीच्या माध्यमातून कृषी युवा क्रांती संघटनेने सोमवार (ता. १६)पासून भूसंपादन कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कृषी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रसाद घेनंद, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे, माजी सरपंच चंदन मोरे, राहुल शिंदे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या बाबत प्रसाद घेनंद, म्हणाले की, ‘‘शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने सरकारने लक्ष देऊन खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

...या आहेत प्रमुख मागण्या

आपण दिलेली १९ (ब)ची भूसंपादनाची नोटीस तत्काळ रद्द करावी.

प्रभाव क्षेत्राची अट वगळून खेड तालुक्यातील बारा गावांमध्ये ग्रामीण विभागाप्रमाणे मोबदला दिला जावा.

आमचा प्रकल्पाला विरोध नाही परंतु चुकीचे निकष लावून दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला आमचा विरोध आहे.

बागायत, हंगामी बागायत यांच्या चुकीचे निकष काढून सर्व क्षेत्राला बागायत प्रमाणे मोबदला दिला जावा.

मागील आंदोलनाचे सगळे गुन्हे मागे घेतले जावे.

मरकळ आणि गोलेगावसाठी १५ मीटर सेवा रस्ता दिला जावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT