Kolhapur Zilha Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Zilha Parishad : कोल्हापुर ‘झेडपी’चा बुधवारी अर्थसंकल्प

गतवर्षी मार्च महिन्यातच प्रशासनाकडे जिल्हा परिषदेचा कारभार आला. या कारभाराला आजअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. बुधवारी (ता. १५) अर्थसंकल्प जाहीर होईल.

वित्त विभागाने अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कंबर कसली असून, सर्व विभागांकडून अखर्चित रकमेची माहिती घेतली जात आहे. अर्थसंकल्पात या वर्षीच्या निधीचे अंतिम सुधारित व पुढील वर्षीचे मूळ अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.

दरवर्षी मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जातो. जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे.

गतवर्षी मार्च महिन्यातच प्रशासनाकडे जिल्हा परिषदेचा कारभार आला. या कारभाराला आजअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प प्रशासनाकडूनच सादर केला जाणार आहे.

अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सर्व विभागांच्या योजना, केलेली तरतूद, झालेला खर्च, उर्वरित रक्कम यासह अंतिम सुधारित तसेच पुढील वर्षीचे मूळ अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी घेतलेल्या योजना विनाअडथळा पार पडल्या आहेत. ज्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत, त्यांचा खर्च इतर योजनांवर केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT