Tomato Rate : २५ रूपये पेंडीला असलेल्या कोथिंबीर पेंडीचा दर अवघ्या ५ रूपयांवर आला आहे. झालेल्या पावसाने कोथिंबीरची मोठी आवक बाजारात झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीरची किरकोळ बाजारात ५ ते १० रुपये पेंढी, तर घाऊक बाजारात २ ते ३ रुपयांपर्यंत पेंढी मिळत आहे. बाजार समितीच्या अहवालानुसार, मागील महिन्याच्या तुलनेत सध्या कोंथिबीरचे उत्पादन सुमारे ४० टक्क्यांनी वाढले आहे.
अचानक पडलेल्या कोंथिबीरच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोंथिबीरचे उत्पादन परवडत नसल्याने उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. सध्या बाजारात पाले भाज्यांच्या दरात वाढ असून टोमॅटोचे दर मात्र चांगले टिकून आहेत. हिरव्या मिरचीला मागच्या माहिन्यात चांगला दर मिळत होता तो सध्या २० ते ३० रूपयांनी उतरला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून रताळ्याची मोठी आवक बाजारात होऊ लागली आहे. फळ बाजारात लाल खजुरापाठोपाठ पिवळ्या ओल्या खजुराची आवक वाढली आहे.
प्रति किलो रुपये भाज्यांचे दर :
टोमॅटो- ५० ते ६०, दोडका- ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ५० ते ६०, मिरची - ५० ते ६०, फ्लॉवर - ५० ते ६०, कोबी- ३५ ते ४०, बटाटा- ४५ ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- १२० ते १४०, गवार - ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, देशी काकडी- १०० ते १२०, काटा काकडी - ५० ते ६०, दुधी - ३० ते ४०, पालेभाज्या - १० रुपये पेंढी, कोथींबीर- ५ ते १०, मेथी - १५, कांदापात -२० ते २५, शेवगा - ८ ते १० रुपये नग.
फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २०० ते २२०, गलांडा - १२० ते १४०, शेवंती - १५० ते १६०.
फळे : सफरचंद - २२० ते ३५०, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.
खाद्यतेल : सरकी - ११२ ते ११५, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - ११२ ते ११५, पामतेल - १०५ ते ११०, सूर्यफूल - ११० ते ११५.
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तूरडाळ- १६० ते १७८, मूगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसूर- ७० ते ७५, फुटाणाडाळ - ८३ ते ८६, चवळी- १०० ते १२०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१२० ते १५०.
देशी काकडीला मागणी; मात्र तुटवडा
उन्हाळ्याचे दिवस संपले तरी पावसाच्या दिवसातही देशी काकडीला डिमांड कायम आहे. या दिवसात देशी काकडीचे उत्पादन फारसे नसल्याने दरावर मोठा परिणाम झाला आहे. काकडीचे दर दुपटीने वाढले आहेत. मागणी जास्त असल्याने आवकेनुसार दर वाढतानाच दिसत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.