Market Committee Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Kolhapur : बाजार समितीत सभापती पदावरून राजकारण तापलं, कोण मारणार बाजी जनसुराज्य की राष्ट्रवादीला?

Kolhapur Bajar Samiti : कोल्हापूर जिल्ह्यातील शेती उत्पन्न बाजारसमितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती मिळून सत्ता आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Market Committee : कोल्हापूर जिल्ह्यातील शेती उत्पन्न बाजारसमितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती मिळून सत्ता आहे. दरम्यान ५ वर्षांच्या कालखंडात विभागून मार्केट कमिटीचे सभापती पद देण्याचे ठरल्याने भारत पाटील यांनी मागच्या काही दिवसापूर्वी राजीनामा दिला आहे.

यावेळी जनसुराज्य पक्षाला संधी असतानाच राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी हालचाली सुरू झाल्याने मार्केट कमीटीमध्ये सभापतीपदावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावर अद्याप नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात काँग्रेसचे चार संचालक, जनसुराज्य तीन संचालक तर राष्ट्रीवादीचे पाच संचालक अशी विभागणी आहे. यात काँग्रेसच्या वाट्याला सभापतीपदाचा एक कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे जनसुराज्यला सभापती पदावर संधी आहे. प्रकाश देसाई यांचे नाव सभापतीपदासाठी चर्चेत पुढे आहे. त्यांना पद मिळाले तर उर्वरीत दोघे नाराज होण्याची शक्यता आहे.

अशात राष्ट्रवादीचे जास्त संचालक असल्याने त्यांच्या वाट्याला तीन वर्षे सभापतीपद येणार आहे. भुदरगड, राधानगरी व कागल येथील राष्ट्रवादीचे संचाल प्रयत्नशील आहेत. कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी अनेकवेळा सभापती व उपसभापती पदी संधी मिळाली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे दुसरे नेते माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्याला यंदा संधी देण्यासाठी विचार सुरू आहे. यात शेखर देसाई यांचे नाव चर्चेत आहे. यंदा राष्ट्रवादीला संधी देऊन पुढील वर्षी जनसुराज्यला संधी त्यानंतरची दोन वर्षे पुन्हा राष्ट्रवादीला संधी मिळेल अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT