Bhogavati Sugar Factory Kolhapur : भोगावती सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३२०० रुपये पहिला हप्ता देणार असल्याची घोषणा कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केली. ते आज ६६ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी बोलत होते. निवडणूक सुरु असल्याने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळाच्या अनुपस्थितीत कार्यक्रम झाला.
ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त कर्मचारी दिनकर भोसले व नानुबाई भोसले (कांचनवाडी) या दाम्पत्याच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला. तर गव्हाणी पुजन प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व रुपाली पाटील यांनी केले. यावेळी श्री. भोसले यांनी कारखाना वाचविण्यासाठी सभासदांसह कामगारांनी प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
कार्यकारी संचालक संजय पाटील म्हणाले, 'भोगावतीचा वजन काटा धर्मकाटा आहे. यंदा कारखान्याकडे ६५० करार व ८२६५ हेक्टर ऊस नोंद आहे. ३१९८ पर्यंत एफआरपीचा ऊसदर बसतो. तरीही पहिला हप्ता ३२०० रुपये देवू. येथे कोणत्याही उपपदार्थाची निर्मिती होत नसतानाहीहा दर उच्चांकी आहे. नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर बोनसबाबतचा निर्णय होईल असे सांगण्यात आले.
यावेळी ऊस वाहतूक संघटनेचे आर. वाय. पाटील, एकनाथ भोसले, कामगार संघटनेचे सुरेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कामगार प्रतिनिधी संचालक विजय पाटील व दत्तात्रय पाटील उपस्थित होते. सुत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. स्वागत सेक्रेटरी उदय मोरे यांनी केले. आभार शिवाजी डोंगळे यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.