Kisan Rail Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Transport : ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

Kisan Samridhhi Train : मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी तसेच मागणीनुसार देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Nashik News : मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी तसेच मागणीनुसार देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देवळाली ते दानापूर या ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ सेवेला कसबे सुकेणे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०११५३ देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष’ रेल्वे ८ मार्च ते १२ एप्रिल २०२५पर्यंत प्रत्येक शनिवार रोजी देवळाली येथून २०.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दानापूर येथे ५.१५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५४ दानापूर ते मनमाड ‘शेतकरी समृद्धी विशेष’ रेल्वे १० मार्च ते १४ एप्रिलपर्यंत प्रत्येक सोमवार रोजी दानापूर येथून १०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मनमाड येथे १०.३० वाजता पोहोचेल.

कसबे सुकेणे स्थानकावर थांबा

गाडी क्रमांक ०११५३ देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ कसबे सुकेणे येथे आगमन २१.०५ वाजता आणि प्रस्थान २१.१० वाजता असेल. या विशेष रेल्वेमध्ये १० व्हीपी डबे (प्रत्येक डब्याची क्षमता २३ टन) आणि १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे समाविष्ट आहेत. ही रेल्वे शेतकऱ्यांसाठी एक मोठा वरदान ठरणार आहे.

ही रेल्वे त्यांच्या उत्पादनांना जलद आणि सुरक्षितपणे विविध मोठ्या शहरांमध्ये पोहोचविण्यास मदत करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचे योग्य बाजारपेठेत वेळेवर वितरण होईल आणि चांगले दर मिळतील. मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT