Kisan Sabha Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Sabha Protest : किसान सभेचे ‘बेमुदत धरणे’ तूर्त स्थगित

Crop Insurance : जिल्हा प्रशासनाने किसान सभेच्या मागण्यातील मुद्दा क्रमांक ३ संदर्भात दिलेल्या लेखी आश्‍वासनानुसार, खरीप २०२३ व रब्बी २०२३-२४ मधील, प्राप्त तक्रारी ज्या अस्वीकृत करण्यात आल्या होत्या.

Team Agrowon

Beed News : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवसांपासून सुरू असलेले किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन गुरुवारी (ता. १२) सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर तूर्त स्थगित करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाने किसान सभेच्या मागण्यातील मुद्दा क्रमांक ३ संदर्भात दिलेल्या लेखी आश्‍वासनानुसार, खरीप २०२३ व रब्बी २०२३-२४ मधील, प्राप्त तक्रारी ज्या अस्वीकृत करण्यात आल्या होत्या. त्याचे पंतप्रधान पीकविमा जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार पुन्हा अवलोकन केले जात आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अद्ययावत यादी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयाला उपलब्ध करून दिली जाईल.

तसेच पीकविमा वाटप झालेले शेतकरी यांच्या पिकाच्या संबंधित लाभाची माहिती पंतप्रधान पीकविमा योजनेच्या पोर्टलवर पाहू शकतात. याशिवाय कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन नंबर १४४४७ वर कॉल करून देखील संबंधित माहिती मिळवता येईल.

मुद्दा क्रमांक ४ नुसार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी १९ जून २०२४ व १२ जुलै २०२४ च्या पत्रांमुळे शेती अवजारे, ठिबक इत्यादी कृषी यांत्रिकी अंतर्गत मिळणाऱ्या उपकरणाच्या प्रलंबित अनुदानाची रक्कम मागणी शासनास करण्यात आली आहे.

कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२४ अन्वये मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान देयक मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. तरी शेती अवजारे, ड्रीप ठिबक इत्यादी कृषी यांत्रिकी अंतर्गत मिळणाऱ्या उपकरणाच्या प्रलंबित अनुदानाचे रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.

पीकविमा वितरण पारदर्शक करण्यासाठी २०२३ खरीप व रब्बी पीकविमा वितरणाच्या याद्या ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच पीककर्जापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार व संबंधित बँकेचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली जाईल.

शिवाय नियमाप्रमाणे कर्जवाटपाची कार्यवाही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याशिवाय इतर मागण्यांच्या अनुषंगाने शासन व संबंधित विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलन थांबून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती बीडचे अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

महत्त्वाच्या मागण्यासंदर्भात येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पावले उचलण्याचे लेखी आश्‍वासन जिल्हा प्रशासनाने दिले. त्यामुळे बेमुदत धरणे तूर्त मागे घेत आहोत. अर्थात, दिलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा मागण्या घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल व आंदोलन केल्या जाईल.
अँड. अजय बुरांडे, जिल्हाध्यक्ष, किसान सभा बीड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT