Eknath shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Compensation : हिरडा नुकसान भरपाईसाठी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Compensation of Hirda Crop : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथे जात असताना सोमवारी (ता. ११) तळेघर येथे त्यांना अखिल भारतीय किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीच्या वतीने हिरडाप्रश्‍नी स्मरणपत्र देण्यात आले.

Swapnil Shinde

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथे श्रावणी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी (ता. ११) दर्शनासाठी आले होते. भीमाशंकर येथे जात असताना त्यांना तळेघर येथे अखिल भारतीय किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीच्या वतीने हिरडा प्रश्‍नाच्या अनुषंगाने स्मरणपत्र देण्यात आले. त्यावेळी संबंधित प्रश्‍नी नक्की लक्ष घालू, असे आश्‍वासन शिंदे यांनी दिले.

शेतकरी, आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्‍नांविषयी नाशिक ते मुंबई व अकोले ते लोणी असे दोन लाँग मार्च किसान सभेच्या वतीने काढण्यात आले होते. त्यात २०२० मधील निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाईल व आदिवासी विकास महामंडळामार्फत बाळ हिरडा खरेदी करून हमीभाव देईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री आणि महसूल मंत्र्यांनी दिले होते. पण या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देण्यात आले.

जिल्ह्यातील आदिवासी भागातील जनतेचे बाळहिरडा हे जगण्याचे प्रमुख साधन आहे. नगदी उत्पन्न मिळवून देणारे ते एकमेव माध्यम आहे. त्यामुळे हिरडा प्रश्‍नांची सोडवणूक करावी. हे प्रश्न सुटले नाहीत तर किसान सभेतर्फे पुढील महिन्यात बेमुदत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे. किसान सभेचे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजू घोडे, मच्छिंद्र वाघमारे, दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे, लखन पारधी, संदीप म्हस्कर, अनंता केंगले, निवृत्ती गवारी, भावेश काठे, निवृत्ती इष्टे, बबन मावळे, प्रकाश वडेकर, साहिल केंगले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT