Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाची पेरणी दोन लाख ४० हजार हेक्टरवर

Kharif Season : खरीपाचा पेरा २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर झाला असून सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिकांसह अन्य पिकांची वाढ चांगली झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात यंदा पेरणीपूर्वी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणी आटोपली आहे. खरीपाचा पेरा २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर झाला असून सोयाबीन, उडीद, मूग, तूर पिकांसह अन्य पिकांची वाढ चांगली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ८७ हजार ०४२ हेक्टरने वाढ झाली आहे, अशी माहित कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात गतवर्षी उन्हाळी, पूर्व मोसमी आणि मॉन्सून पावसाने दडी मारली. उशिरा पाऊस सुरू झाला. याचा फटका खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीवर झाला. गत वर्षी १ लाख ५३ हजार १४८ हेक्टर म्हणजे ५९ टक्क्यांवर पेरा झाला होता. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकेही वाया गेली होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच उत्पादन आले नाही.

यावर्षी हवामान खात्याने वेळेवर पाऊस सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार जून महिन्याच्या मध्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा वेळेत सुरू केला. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाने उघडीप दिली. या दरम्यान, सोयाबीन, भूईमुग, या पिकांसह अन्य पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी उरकून घेतली.

त्यानंतर जुलैच्या मध्यानंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला. यंदाच्या खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर असून २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने क्षेत्रात ८७ हजार ०४५ हेक्टरने वाढ झाली आहे.

ज्वारी, तूर, मुग, सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत असून आगाप पेरणी केलेली पिके फुरोलावस्थेत आहेत. तर मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन, मका, मूग या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांना याबाबत जनजागृती केली आहे.

तालुकानिहाय अंतिम पेरणीस्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २३ हजार ०१६

जत ७५ हजार १४६

खानापूर १६ हजार ३२८

वाळवा २० हजार ९६०

तासगाव ३१ हजार ९९९

शिराळा १९ हजार ३१३

आटपाडी १४ हजार ४११

कवठेमहांकाळ २१ हजार ७३०

पलूस ५ हजार ८४१

कडेगाव ११ हजार ४४५

एकूण २ लाख ४० हजार १९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्यासाठी काही मुद्द्यांवर सहमती; अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीअर यांची समितीसमोर माहिती

MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी

Post Harvest Management: पॅकहाउस उभारणीसह प्रक्रिया पद्धती बसविताना...

Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर

Chilli Business Story: मिरची विक्रीला दिले व्यावसायिक रूप

SCROLL FOR NEXT