Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : हंगाम तोंडावर, तरी विमाभरपाई नाही

Kharif Season : नवीन शेती हंगाम अवघ्या काही दिवसांवर असताना देखील गेल्या हंगामातील पीकविम्याची भरपाई मिळत नसल्याने मारेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : नवीन शेती हंगाम अवघ्या काही दिवसांवर असताना देखील गेल्या हंगामातील पीकविम्याची भरपाई मिळत नसल्याने मारेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देते. त्याकरिता जागृतीदेखील सातत्याने केली जाते. या आवाहनाला प्रतिसाद देत २०२२-२३ या वर्षात मारेगाव तालुक्‍यातील १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात १.२५ कोटी रुपयांच्या वर पीकविमा हप्ता भरला.

त्याच वेळी तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना पूर, महापूर येत पिके पाण्याखाली आली. काही ठिकाणी पिके खरडून गेली. १०० टक्‍के पिकांचे नुकसान झाले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली.

६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी मानत भरपाई देण्याचे धोरण आहे. विमाभरपाईसाठी ४८ तासांच्या आत विमाधारकांना ऑनलाइन तक्रार कंपनीकडे करावी लागते. त्यानंतर कंपनीचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करून विमा कंपनीला पाठविता.

तालुक्‍यातील विमाधारक शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी केल्या. पंचनामेही झाले. अहवाल पाठविण्यात आला. परंतु विमा कंपनीने तालुक्‍यातील काही आपद्‍ग्रस्तांना मदत करीत उर्वरित बाधितांना वाऱ्यावर सोडले.

परिणामी, या शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्‍त होत आहे. शेतीचा नवीन हंगाम तोंडावर आला असताना ही सात हजारांपेक्षा अधिक शेतकरी विमाभरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे नवीन हंगामात पीकविमा न काढण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

दरम्यान, विमा भरपाई संदर्भात असलेल्या तक्रारींच्या निवारणाकरिता तहसीलदारांकडे अर्ज करावेत, असे आवाहन अजय धोबे यांनी केले आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT