Summer Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : अमरावती जिल्ह्यात खरिपाची ६ लाख हेक्टरवर पेरणी

Kharif Season 2025 : कृषी निविष्ठांच्या खरेदीत विक्रेत्यांकडून होणाऱ्या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Team Agrowon

Amaravati News : आगामी खरीप हंगामात ६ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणार आहे. त्यासाठी ८९ हजार ११३ क्विंटल बियाणे व १ लाख ४३ हजार टन खतांच्या नियोजनावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कृषी निविष्ठांच्या खरेदीत विक्रेत्यांकडून होणाऱ्या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आल्यानंतर सुधारित नियोजन कृषी विभागाने तयार केले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ६ लाख ९१ हजार ७९९ हेक्टरपैकी ६ लाख ८५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. सोयाबीन, कापूस, तूर या मुख्य पिकांसह मूग, उडीद, ज्वारी व मका आदी पिकांखाली क्षेत्र येणार आहे. कपाशीच्या क्षेत्रात यंदा १२ हजार हेक्टरने वाढ तर सोयाबीनच्या क्षेत्रात २३ हजार ९०० हेक्टरने वाढ होण्याचे प्रस्तावित आहे.

प्रस्तावित पेरणीक्षेत्राच्या अनुषंगाने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे. कापसासाठी ५ हजार ९१३ क्विंटल (१२,४७,५०० पाकिटे), सोयाबीनसाठी ७० हजार २९७ क्विंटल व तुरीसाठी ५ हजार ८०८ क्विंटल बियाणे लागणार आहे. प्रस्तावित क्षेत्रासाठी १ लाख ४३ हजार ३६८ टन रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे.

...तर शेतकऱ्यांना येणार वीजबिल

अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना वीजदेयकाची सवलत दिली जाणार नाही. फार्मर आयडी नसलेल्यांना जुलैपासून देयक देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

तसेच ३१ मे पूर्वी नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन केले. खरीप हंगाम २०२५ चा आढावा घेतल्यानंतर त्यांनी या सूचना दिल्या. पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगामाचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT