Sugarcane Farmer Protest agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer Protest : कोल्हापुरातील खांडसरी कारखाना 'स्वाभिमानी'ने पाडला बंद, काटामारीही केली उघड

Jaggery Rate : कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील सातार्डे येथे श्रीकृष्ण अॅग्रोडायट या जागरी कारखान्याचा गाळप हंगाम गेली चार दिवसांपासून सुरू होता.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Rate : कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील सातार्डे येथे श्रीकृष्ण अॅग्रोडायट या जागरी कारखान्याचा गाळप हंगाम गेली चार दिवसांपासून सुरू होता. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्षेप घेत हा कारखाना बंद पाडला.

कार्यकर्त्यांनी संस्थापक अध्यक्ष के.एस. चौगले यांना दर जाहीर न करता कारखाना कसा चालू केला? याबाबत जाब विचारला. यावेळी कार्यकर्ते व चौगले यांच्यात वाद झाला. काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

के.एस. चौगले यांच्या मालकीचा श्रीकृष्ण अँग्रोडायट हा गुळपावडर व खांडसरी कारखाना सातार्डे येथे आहे. गेली चार दिवस या कारखान्यात ऊस गाळप हंगाम सुरू आहे. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विक्रम पाटील, बाजीराव पाटील, दगडू गुरवळ, राम चेचर, महादेव झेंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढत हा कारखाना बंद केला.

यावेळी उसाची वाहने अडविण्यात आली. कारखाना बंद करण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी अध्यक्ष के.एस. चौगले कारखानास्थळावर आले. स्वाभिमानीच्या कार्यकत्यांनी यावर्षीचा प्रतिटन ऊसदर जाहीर केलेला नाही, हंगाम कसा सुरू केला मागील हंगामातील ४०० रुपये प्रतिटन द्या, अशी मागणी केली.

धनाजी बोरगे (पडळ), दगडू गुरवळ यांनी काट्यात तफावत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT