Banana Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Plantation : मृग बहर केळीचे क्षेत्र पोहोचणार ७५ हजार हेक्टरवर

Banana Farming : केळीचे दर यंदा बरे आहेत. दर्जेदार, निर्यातक्षम केळीचे दर चांगले होते. कलिंगड, कांदा व इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सध्या अर्ली मृग बहर केळीलागवड सुरू आहे. मृग बहरातील लागवड जूनमध्ये गतीने सुरू होईल. यंदा केळी लागवड खानदेशात सुमारे १२ ते १५ हजार हेक्टरने वाढू शकते, असे संकेत आहेत. केळीच्या उतिसंवर्धित रोपांची मागणी वाढली असून, त्यांचा तुटवडा आहे.

केळीचे दर यंदा बरे आहेत. दर्जेदार, निर्यातक्षम केळीचे दर चांगले होते. कलिंगड, कांदा व इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे. कारण दर कमी अधिक झाले. केळी पीक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडले. कांदेबाग केळी व मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले.

जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली. तर कांदेबाग केळीची काढणी दसऱ्यापासून सुरू होत असते. सध्या मृग बहर केळीची काढणी सुरू आहे. या केळीला सध्या किमान १००० व कमाल १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळात आहे.

मृग बहर केळीची लागवड मे अखेरीस सुरू होते. अर्ली लागवड एप्रिल-मेच्या मध्यात केली जाते. नियमित लागवड जूनपासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते.

कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते. तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. खानदेशात लागवड सुमारे ७० ते ७५ हजार हेक्टरवर होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT