Khandesh Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain News : खानदेशात मध्यम पाऊस

Khandesh Rain Update : खानदेशात बुधवारी (ता. २८) दुपारी, सायंकाळी व मध्यरात्रीनंतर अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस झाला असून, तेथे पेरण्या सुरू होतील.

Team Agrowon

Jalgaon Rain News : खानदेशात बुधवारी (ता. २८) दुपारी, सायंकाळी व मध्यरात्रीनंतर अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस झाला असून, तेथे पेरण्या सुरू होतील.

नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील काही भागात मात्र जोरदार सरींची प्रतीक्षा आहे. गुरुवारी (ता. २९) पावसाळी वातावरण होते. अधूनमधून सरी कोसळत होत्या. परंतु जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल, जामनेर भागात जोरदार पाऊस झालाच नाही.

पिंपळनेर परिसरात आगमन

पिंपळनेर (ता.साक्री) येथे महिनाभर ओढ दिलेल्या मोसमी पावसाचे पिंपळनेर शहरासह परिसरात जोरदार आगमन झाले. बुधवारी (ता.२८) सायंकाळी साडेसहापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पाऊस नसल्याने पिंपळनेरसह परिसरातील शेतकरी, व्यावसायिकांसह नागरिक हवालदिल झाले होते. जून महिना कोरडा गेल्याने तसेच लाटीपाडा (पांझरा) धरणाची पाणीपातळी खालावली होती. लांबलेला पाऊस सुरू झाल्याने शहरासह परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.

साक्रीच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस

वार्सा (ता.साक्री) भागात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत होता. बुधवारी (ता. २८) दुपारी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून, आता पेरणी व भात, नागलीचे रोप टाकण्यास काही हरकत नाही, असे जाणकार शेतकरी सांगतात. महिनाभर ओढ दिलेल्या मोसमी पावसाने पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातजोरदार आगमन झाले.

तळोदा, शहाद्यात जोरदार सरींची प्रतीक्षा

तळोदा, शहादा (जि.नंदुरबार) भागातही मध्यम पाऊस झाला. पण जोरदार पाऊस आलेला नाही. . गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असले तरी अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस बरसला नाही. परंतु पावसाळी वातावरण लक्षात घेता पुढील आठवड्यात पेरण्या सुरू होतील, असे दिसत आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करून घरात ठेवले आहेत. परंतु वरून राजा बरसत नसल्याने बागायतदार शेतकरीही चिंताग्रस्त आहे. कारण पेरण्या लांबल्या आहेत. बागायती कापूस, ऊस, केळी, पपई आदी पिकांची बागायतदार शेतकऱ्यांनी लागवड केली, परंतु कोरडवाहू जमीनधारकांना पावसाची अपेक्षा आहे.

बुधवारचा पाऊस (मिलीमीटरमध्ये)

जळगाव १३, चोपडा १०, धरणगाव १४, पारोळा ११, जामनेर १०. धुळे १३, साक्री १८. शहादा १०, तळोदा १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT