Jaggery Rate Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Rate Kolhapur : कर्नाटकच्या गुळाची कोल्हापूर ब्रँडने विक्री; संतप्त शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद

Jaggery Farmers : प्रतिक्विंटल गुळाला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये दर मिळावा. कर्नाटकचा गूळ 'कोल्हापूर किंवा शाहू ब्रँडने' विक्री करू नये, अशी मागणी करत गूळ उत्पादकांनी सौदे बंद पाडले.

sandeep Shirguppe

Jaggery Rate : प्रतिक्विंटल गुळाला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये दर मिळावा. कर्नाटकचा गूळ 'कोल्हापूर किंवा शाहू ब्रँडने' विक्री करू नये, अशी मागणी करत गूळ उत्पादकांनी सोमवारी (ता.२५) शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल ५० हजार गूळ रव्यांचे सौदे बंद पाडले.

दरम्यान, कर्नाटकच्या गुळाचे स्वतंत्र सौदे काढले जावेत तसेच गुळाचे दर ३ हजार ८०० रुपयांच्या खाली आल्यास त्या गुळाचे सौदे काढले जाऊ नये, असा निर्णय झाला. त्यामुळे मंगळवार (ता.२६) पासून पूर्ववत गूळ सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रतिक्विंटल गुळाला दर ४ हजार रुपयांहून अधिक दर मिळावा. बाहेरच्या राज्यातील गूळ 'कोल्हापूर बँड'ने विक्री करण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत गूळ उत्पादकांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत होणारे सौदे बंद पाडले.

गुळाला प्रतिक्विंटल ३ हजार ६०० रुपयांपेक्षा कमी दर जाहीर केला जात आहे. याचा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर उत्पादकांवर नेहमी कमी दराचे संकट लादले जात आहे.

यामध्ये व्यापाऱ्यांनी किमान प्रतिक्विंटल गुळाला ३ हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त दर देणे अपेक्षित आहे. साखर कारखान्यांनी उसाला दिलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने गुळाचे सौदे काढले जात होते. सद्या साखरेच्या दरापेक्षा कमी दर गुळाला दिला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गूळ सौदे बंद पाडले.

याशिवाय, परजिल्ह्यातील गुळ कोल्हापूर ब्रँड किंवा शाहू गूळ या नावाने विक्री केला जात आहे. यावर तत्काळ बंदी घातली पाहिजे. तसेच, चुकीच्या पद्धतीने कोल्हापूर ब्रँड वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गूळ उत्पादकांनी केली.

दरम्यान, कर्नाटकच्या गुळाचे स्वतंत्र सौदे काढले जातील. तसेच ३ हजार ८०० रुपयेपेक्षा कमी दर आल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाचे सौदे काढले जाऊ नयेत, असा तोडगा बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई व माजी सभापती भारत पाटील यांनी यावर बैठक घेऊन तोडगा काढला. यावेळी अमित पाटील, दिलीप पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT