Jowar Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : शिरोळमध्ये शाळूला अवकाळीचा फटका

Jowar Crop Damage : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांमागे अवकाळीचे दुष्टचक्र कायम आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शाळू पिकाला मोठा फटका बसला.

Team Agrowon

Jausingpur News : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांमागे अवकाळीचे दुष्टचक्र कायम आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शाळू पिकाला मोठा फटका बसला. पोटरीला आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

बाजारात ज्वारीचे दर वाढत असताना आशावादी शेतकऱ्यांच्या पदरी अवकाळीने निराशा टाकली आहे. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर खोडवा ऊस कारखान्याला पाठवून शाळू, हरभरा, गहू अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा होता.

रब्बीची वेळेत पेरणी करून हाताला आलेले शाळू पीक अवकाळीच्या फटक्यात जमीनदोस्त झाले आहे. सात ते आठ फुटांपर्यंत पिकाची वाढ झाली. पोटरी पडण्याच्या मार्गावर पीक असतानाच शनिवारी (ता. ६) रात्री झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला.

जयसिंगपूर येथील भूपाल खामकर या शेतकऱ्याला अवकाळीचा मोठा फटका बसला. पिकाचे मोठे नुकसान झाले. पोटरी पडण्याच्या काळातच अवकाळीमुळे पिकाचे नुकसान झाले.

बाजारात ज्वारीचे दर ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असताना वर्षभराची बेगमी होईल, या उद्देशाने शाळू लागवड केली. दोन-अडीच महिन्यांपासून पिकांची काळजी घेतली, मशागत केली, मात्र अवकाळीने यावर पाणी पडले. यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT