Joint Parliamentary Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Joint Parliamentary Committee : कृषी, पशुसंवर्धनची संयुक्त संसदीय समिती महाराष्ट्र दौऱ्यावर

Maharashtra Visit : कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयाची संयुक्त संसदीय समिती तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर येणार असून मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयाची संयुक्त संसदीय समिती तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर येणार असून मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारपासून (ता. १७) पुढील तीन दिवस ही समिती हॉटेलमध्ये आढावा घेणार आहे.

या समितीची बडदास्त ठेवण्यासाठी कृषी आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ही संसदीय समिती प्रामुख्याने कृषी आणि अन्न प्रक्रिया विभागाचा आढावा घेणार आहे.

संसदीय समिती १६ ते २१ जानेवारी या काळात दीव, मुंबई आणि विजयवाडाच्या दौऱ्यावर आहे. समिती १७, १८ आणि १९ जानेवारी रोजी मुंबईत असेल. ही समिती प्रामुख्याने कृषी आणि कृषी प्रक्रिया, अन्न प्रक्रियेचा आढावा घेणार आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या समितीची निवासव्यवस्था करण्यात आली असून येथे आढावा घेतला जाणार आहे. या समितीसमोर कृषी, पशुसंवर्धन विभाग सादरीकरण करणार असून समितीच्या शंकांना उत्तरे देण्यात येतील.

या समितीची बडदास्त ठेवण्यासाठी कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व व्यवस्था चोख राहील याकडे यंत्रणेचे लक्ष लागले आहे. काही अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या असून त्यात कोणतीही गफलत होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत सूचना वरिष्ठ पातळीवरून दिल्या आहेत.

राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हिश्शातून अनेक योजना राबविल्या जातात. या योजना प्रभावीपणे राबविणे राज्य सरकारची जबाबदारी असते. या योजनांचा आढावा ही समिती घेणार आहे.

वास्तविक गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि हवामान बदलाचा मोठा फटका राज्याला बसला होता. त्यावेळी केंद्राच्या पथकांकडून पाहणी होणे आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आता संसदीय समितीच्या दौऱ्याची जय्यत तयारी कृषी विभाग करत असून अधिकाऱ्यांना ‘विशेष जबाबदाऱ्या’ देण्यात आल्या आहेत. याचीच चर्चा सध्या कृषी विभागात जोरात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT