jayant patil Agrowon
ॲग्रो विशेष

Jayant Patil : जयंत पाटील यांचे निलंबन; विधानभवन परिसरात प्रवेशबंदी

सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यामुळे गोंधळ पुन्हा वाढला. त्यानंतर ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

Team Agrowon

विधिमंडळाच्या चौथ्या दिवशी (ता.२२) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांना विधानभवन परिसरात नागपूर आणि मुंबई अधिवेशनापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली.

विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान चर्चा सुरू होती. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संतापले आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 'हा काय निर्लज्जपणा आहे...' असे म्हणाले.

त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यामुळे गोंधळ पुन्हा वाढला. त्यानंतर ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि कॉँग्रेसचे नाना पटोले आणि नेत्यांची बैठक झाली.

कामकाज सुरू झाल्यानंतर नागपूर व मुंबई येथील विधिमंडळाच्या परिसरात पाटील यांना बंदी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. आणि लगचेच या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. आणि मुंबई आणि नागपूर विधानभवन परिसरात त्यांना बंदी घालण्यात आली.

यानंतर विरोधी पक्षाने संताप व्यक्त करत सभागृह सोडले. जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत जयंत पाटील यांच्यावर एकदम बंदी घालू नये अशी विनंतीही पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT