Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Jaltara Project : जलतारा योजनेतून भूजल पातळी वाढणार

Water Scarcity : दरवर्षी अपेक्षेपक्षा जास्त पाऊस पडूनही रायगड जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Team Agrowon

Raigad News : दरवर्षी अपेक्षेपक्षा जास्त पाऊस पडूनही रायगड जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बेसुमार वृक्षतोड व पर्यायाने कमी झालेली भूजल पातळी याला कारणीभूत आहे.

यासाठीच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी गावातील शेतामध्ये ‘जलतारा’ योजना राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांकडून जलतारा योजनेंतर्गत शोषखड्डे निर्माण केले जात आहेत. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यास मदत होणार आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीत पाच चौरस फूट आकाराचा शोषखड्डा खोदावा लागणार असून, या कामाची मजुरी म्हणून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. ‘जलतारा’ योजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून राहते, ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या नुकसानीला तोंड देतात. ‘जलतारा’ योजनेतून पाणी निचरा करण्याची प्रक्रिया साधली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी योग्य प्रकारे व्यवस्थापित होऊन, त्याचा योग्य वापर होतो.

‘जलतारा’ योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. जास्त जमीन असल्यास त्या-त्या क्षेत्रानुसार ‘जलतारा’ मंजूर केला जाऊ शकतो. या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक शेतकऱ्यांना गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घेता येणार आहे.

शेतकऱ्याला ४,८०० रुपये

जलतारा योजनेंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून चार हजार ८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यासह शेतकऱ्याला नफा मिळणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचा सातबारा, आठ अ, आधार कार्ड आणि एमआरईजीएसचे जॉब कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी मतदान सुरु, कोण, कुठे रिंगणात? महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध

Bovine Breeding Act: गोजातीय प्रजनन अधिनियमाची अंमलबजावणी सुरू

Beed Water Crisis: पाणीबाणीचे सावट; १४ प्रकल्प कोरडेठाक

Dodka Production: दोडका उत्पादनात एकरी तीन ते सहा टन वाढ

Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान

SCROLL FOR NEXT