Crop Insurance Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Agitation : पीकविमा भरपाईसाठीचे जलसमाधी आंदोलन अखेर स्थगित

Farmer Demands : शेतकऱ्यांनी पीकविमा परतावा मिळावा, तसेच सोयाबीन पिकावरील विम्याची उर्वरित ७५ टक्के नुकसान भरपाई मिळावी या मागण्या केल्या होत्या.

Roshan Talape

Jalna News : खरीप २०२३ व रब्बी २०२३ मधील विमा भरपाईबाबत अनेकदा तक्रारी देऊनही विमा कंपनीकडून काहीही हालचाली झाल्या नाही. त्यामुळे युवा शेतकरी समिती तसेच विमाधारक शेतकऱ्यांकडून आज गोदापात्रात पीकविमा भरपाईबाबत जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२) गोदापात्रात पीकविमा परताव्यासाठी आंदोलन सुरू केले होते. जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी दावेही दाखल केले होते. परंतू पीकविमा योजनेअंतर्गत कोणतीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी शेतकऱ्यांनी पीकविमा परतावा मिळावा, तसेच सोयाबीन पिकावरील विम्याची उर्वरित ७५ टक्के नुकसान भरपाई मिळावी या मागण्या केल्या होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधींशी चर्चा करुन शासन निर्णयानुसार योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

यावेळी युवा शेतकरी समितीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिले. तसेच १४ दिवसांत मागण्यांची पुर्तता करावी, अशी विनंती केली. यानंतर गोदापात्रात सुरु असलेले जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले.

काय आहेत मागण्या

१) प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे झालेल्या बैठकीचे इतिवृत्त देणे.

२) जालना जिल्ह्यातील सन २०२३ दुष्काळ मध्ये असून खरीप उर्वरित सोयाबीनचा ७५% व रब्बी पिक विमा सरसकट देण्यात यावा.

३) खरीप २०२३ व रब्बी २०२३ चे प्रधानमंत्री पिक विमा योजना पंचनामा अहवाल देणे.

४) अंतिम पिक कापणी प्रयोग अहवाल देणे.

५) विमा प्रतिनिधी ने शेतात येऊन केलेल्या स्पॉट पंचनामा लोकेशन फोटो व पंचनामा प्रत देणे,

६) १७ ते २४ नोव्हें. २०२३ मधील व ७ ते १४ डिसें. २०२३ सॅटॆलाईट उपग्रह फोटो देण्यात यावे.

७) रब्बी हंगाम २०२३ मधील पिक विमा जालना जिल्ह्यातील शेतकरी यांनी किती क्षेत्र भरला व पिक विमा कंपनीने नुकसान पोटी किती रक्कम वाटप केली त्याची यादी देणे.

८) युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स (Universal Sompo General Insurance) पिक विमा कंपनी वर गुन्हे दाखल करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT