Jal Jivan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ची कामे रेंगाळली

Water Supply Scheme : ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळकनेक्शन व्हावे म्हणून केंद्राने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत बागलाण तालुक्यात कामे संथगतीने सुरू आहेत.

Team Agrowon

Nashik News : ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळकनेक्शन व्हावे म्हणून केंद्राने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत बागलाण तालुक्यात कामे संथगतीने सुरू आहेत.

१२२ पैकी ५३ गावांतील कामे प्रलंबित राहणार असल्याने यंदाही या गावांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला तालुक्यात घरघर लागली आहे. २०२०-२१ व २०२२ -२३ अशा दोन टप्प्यांत जलजीवनची कामे मंजूर झाली असून १८ ते २२ महिन्यांत योजनेची सर्व कामे पूर्ण करून द्यायची ठेकेदारांना अट होती.

मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या मजूर संस्थांवर दंडात्मक कारवाईची निर्देशही शासनाने दिले होते. मात्र मुदत संपूनही बागलाण तालुक्यात अनेक गावात जलजीवनची कामे आजही संथ गतीने सुरू आहेत.

बागलाण तालुक्यातील ११२ गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश होता. २०२२ मध्ये ही कामे मंजूर होऊन मार्च २०२४ पर्यंत या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्याचे उदिष्ट होते. मात्र तालुक्यात ११२ पैकी फक्त ३७ गावांची कामे पूर्ण झाली असून ७५ गावांतील योजनेची ५० टक्के कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.

७५ पैकी येत्या जूनअखेर २२ योजना पूर्ण होणार असल्याचा दावा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. ५३ गावांतील ५० टक्के कामे प्रलंबित राहतील म्हणून या गावांना पुन्हा पाणी समस्येला सामोरे जाण्याची नामुष्की येणार आहे.

जलकुंभाचा वाद विकोपाला

वाठोडा कोरोबानगर व गांधीनगर या गृप ग्रामपंचायत असलेल्या तिन्ही गावात जलजीवन योजनेच्या जलकुंभाच्या जागेवरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. योजनेचा मुख्य जलकुंभ आपल्याच गावात व्हावा यासाठी वाद सुरु असून हा वाद न मिटल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दोन्ही गटांकडून तालुका प्रशासनास प्रशासनास देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT