Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Apmc Election Update : जळगाव बाजार समिती निवडणुका युतीतर्फेच लढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. त्यामुळे कोणाकडेही लक्ष न देता आम्ही त्यांच्याकडे पाहून भाजपसोबतच राहणार आहोत.

Team Agrowon

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. त्यांच्यासोबत आपण कायम राहणार आहोत. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकीत आपली भाजपसोबत युती होईल.

मात्र, काही दुफळी करणारे कार्यकर्ते प्रत्येक वेळी ‘युती’ तोडण्याचाच प्रयत्न करतात. अशापासून भाजप आणि शिवसेनेही सावध राहावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केले.

जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकासंदर्भात (Market Committee Election) चर्चा करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते.

आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil), आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil), माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख नीलेश पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. त्यामुळे कोणाकडेही लक्ष न देता आम्ही त्यांच्याकडे पाहून भाजपसोबतच राहणार आहोत. केवळ बाजार समितीतच नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीतही युती कायम राहील.

त्यामुळे बाजार समितीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोणीही नाराज होऊ नका. पुढे तुम्हाला संधी मिळणार आहे. आम्ही केवळ निवडणूक लढवायची म्हणून ‘युती’ करणार नाही, तर प्रत्येक उमेदवार विजयी व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

जेवढी ताकद शिवसेना लावेल, तेवढीच ताकद भाजप उमेदवारांच्या विजयासाठी लावणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार यासाठी प्रयत्न करतील. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार नाहीत, तेथे जवळच्या तालुक्यातील आमदार लक्ष देतील.

आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समित्यांची निवडणूक भाजप-सेना युतीतर्फे लढविण्यात येईल.

बाजार समिती निवडणुकीतील बारकावे, तसेच तांत्रिक बाबींचीही त्यांनी माहिती दिली. रिपाइं (आठवले गट) चे मुकुंद नन्नवरे यांनी आभार मानले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT