Jalgaon Jamod Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Jamod Market Committee : जळगाव जामोद कृषी बाजार समिती सभापतिपदी प्रसेनजित पाटील

Agriculture Produce Market Committee : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी (ता. १५) राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांची निवड झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon Jamod Market Committee Update : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी (ता. १५) राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांची निवड झाली आहे. तर उपसभापतिपदी शिवसेनेचे माणिकराव वाघ यांची निवड झाली.

सभापतिपदासाठी सोमवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीत विरोधी पॅनेलचे रंगराव देशमुख यांचा पाटील यांनी पराभव केला. पाटील यांना ११, तर देशमुख यांना सात मते मिळाली.

त्याचप्रमाणे उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांचे बंधू माणिकराव वाघ यांना ११ मते मिळाल्याने ते विजयी झाले, तर विरोधी पॅनेलचे उमेदवार भास्कर राऊत यांना सात मते मिळाली.

माणिकराव वाघ हे चौथ्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले असून, हमाल प्रतिनिधीला उपसभापती होण्याचा मान हा प्रथमच मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास आघाडी पॅनेलला १८ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या.

तर पक्षविरहित शेतकरी विकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले होते. आजी, माजी आमदारांचे सहकार्य असलेले पाच पक्षांचे पक्षविरहित शेतकरी विकास पॅनेल एकीकडे, तर प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात असणारे शेतकरी सहकार विकास आघाडी पॅनेल दुसरीकडे, असा सामना रंगला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT