Raj Thackeray meet jarange Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : जालन्यात राज ठाकरेंनी घेतली मनोज जरांगेची भेट ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जालन्यात जाऊन जाऊन मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर या सगळ्या प्रकारावर भाष्य केलं.

Swapnil Shinde

Jalana maratha reservation protest : मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे-पाटील यांनी सात दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अशातच शनिवारी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना दौरा केला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सरकारवर घणाघाती टीका केली.

लाठीचार्जची घटना घडल्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालना दौरा केला. यावेळी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाला पक्षाचे समर्थन दिले.

यावेळी बोलताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. मी आज राजकारण करायला या ठिकाणी आलेलो नाही. पण जी दृश्यं मी पाहिली, ज्या प्रकारे माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या ते बघवलं नाही म्हणून मी जालन्यात आलो. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी तुमचा जीव गमावू नका. पोलिसांना दोष देऊ नका, आदेश कुणी दिला त्यांना दोष द्या असं राज ठाकरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Agriculture Input GST : शेती अवजारांवरील जीएसटी रद्द होणार?

Crop Damage Compensation : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींची भरपाई

Voter Fraud: चंद्रपूरमध्ये एकच घरात ११९ मतदार; मतदार यादीतील आणखी एक गैरप्रकार उघड

Ladki Bahin Yojana: साताऱ्यात ८४ हजार अपात्र लाडक्या बहीणी; १५१ कोटींची वसुली होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT