Kolhapur Jaggery agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Jaggery : गूळ कर्नाटकचा, शिक्का कोल्हापूरचा बाजार समितीतील प्रकार; व्यापाऱ्यांच्या चलाखीने शेतकरी अस्वस्थ

Jaggery Production : कोल्हापूर जिल्ह्यातून गुळाची आवक कमी असताना, प्रत्यक्ष बाहेर जाणारा गूळ जास्त कसा? असा प्रश्‍न कोल्हापुरातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

sandeep Shirguppe

Jaggery Production Kolhapur : कर्नाटकचा गूळ खरेदी करून तो कोल्हापुरी असल्याचा शिक्का मारून अन्य राज्यात विक्रीला पाठवला जात आहे. कोल्हापूर बाजार समितीत हा प्रकार शेतकऱ्यांनी उघडकीस आणला त्यातून सौदे बंद पाडण्यात आले. मुळात कोल्हापूर जिल्ह्यातून गुळाची आवक कमी असताना, प्रत्यक्ष बाहेर जाणारा गूळ जास्त कसा? असा प्रश्‍न कोल्हापुरातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

गूळ उत्पादनास कोल्हापूर जिल्ह्यातील माती, पाणी आणि हवामान यामुळे जगभर मागणी असते. परंतु कामगारांची उणिव गुऱ्हाळ चालवण्यासाठी लागणारे भांडवल कमी पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळ घरे बंद झाली आहेत. जी काही सुरू आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात गूळ उत्पादन होत नाही.

दुसरीकडे कोल्हापुरातील गुळाची चव, रंग आणि अन्य दर्जा बघून सौदे निघतात. त्यात बहुतांशी व्यापारीच या गुळाचे दर ठरवतात. पण, कर्नाटकातून येणारे गुळाने भरलेले ट्रक थेट व्यापाऱ्यांच्या गोदामात उतरले जातात. त्याचा सौदा निघत नाही किंवा त्याची चवही बघितली जात नाही. दर्जाच न तपासता हा गूळ व्यापारी थेट खरेदी करतात यामुळे कोल्हापुरी गुळाची चव आणि दर दोन्हींवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई म्हणाले की, शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. झोनबंदी नसल्याने कर्नाटकातील गूळ खरेदी करण्याची व्यापाऱ्यांना मुभा आहे. विक्रीसाठी जाणाऱ्या गुळावरील ‘सेस’ फक्त समितीकडे जमा होतो. असे देसाई म्हणाले.

कर्नाटकच्या गुळाला विरोध नाही; पण...

मागच्या दोन दिवसांपूर्वी दरावरून गूळ सौदे बंद पाडण्यात आले. यामध्ये कर्नाटकातून गूळ कोल्हापुरी म्हणून विकला जात असल्याचेही उघडकीस आले. कर्नाटकातून आलेल्या आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गुळाला स्थानिक शेतकऱ्यांचा अजिबात विरोध नाही. त्यांनी तो गूळ खरेदी करावा; पण त्यावर कोल्हापूरचा शिक्का मारून तो विकू नये, अशी गूळ उत्पादकांची मागणी आहे.

व्यापाऱ्यांची चलाखी

कोल्हापूरच्या तुलनेत कर्नाटकच्या गुळाचा दर्जा चांगला नसतो. त्यामुळे त्याला दर कमी मिळतो. त्याच दरात व्यापाऱ्यांकडून स्थानिक गुळाचे सौदे काढण्याचा प्रयत्न होते. त्यातून शेतकरी व व्यापारी वाद होऊन सौदे बंद पडतात असे मत काही गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी मांडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT