Jaykirtiman Patil Patil
ॲग्रो विशेष

Soil Testing : कांदा लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे

Onion Management : कांदा लागवड शास्त्रीय पद्धतीने करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. चांगले कांदा उत्पादन घेण्यासाठी शरीरशास्त्रानुसार नियोजन करावे, असे प्रतिपादन कृषी साहाय्यक जयकीर्तिमान पाटील यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : कांदा लागवड शास्त्रीय पद्धतीने करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. कांदा पिकात पाणी व्यवस्थापन (वापसा) करावे. चांगले कांदा उत्पादन घेण्यासाठी शरीरशास्त्रानुसार नियोजन करावे, असे प्रतिपादन कृषी साहाय्यक जयकीर्तिमान पाटील यांनी केले.

वीरगाव (ता. बागलाण) येथे ‘सकाळ-अॅग्रोवन’ व रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे कांदा उत्पादकांसाठी ‘दर्जेदार कांदा लागवड तंत्रज्ञान’ या विषयावरील चर्चासत्र झाले. त्या वेळी पाटील बोलत होते.

रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राचे व्यवस्थापक विजय घुगे, एकनाथ आहिरे, आकाश गांघले, रोहित खैरनार, भावेश पाटील, सरपंच केदा निकम, मधुकर गांगुर्डे, लालू, देवरे, नितीन गांगुर्डे, ज्ञानेश्वरदेवरे उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की रासायनिक खतांचे लागवडी अगोदर नियोजन करावे. सेंद्रीय खताचा वापर करावा. कांदा लागवड करण्याच्या अगोदर जमिनीचा सेंद्रीय कर्ब एक टक्का असावा. कांदा उत्पादनासाठी बीजोत्पादन महत्त्वाचे असते. एकरी तीन लाख ९१ हजार ५०० रोपाची संख्या असावी. तणनाशकाचा योग्यवेळी वापर करणे आवश्यक आहे.

चांगल्या उत्पादनासाठी जमिनीला विश्रांती देणे गरजेचे आहे. कीटकनाशक व बुरशीनाशक योग्यवेळी फवारणी करावी. कांदा रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलावी. कांदा काढणी अगोदर बुरशीनाशकांची फवारणी करावी व नंतर कांदा चाळीमध्ये साठवणूक करावा. लोणाळे यांनी पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाची माहिती सांगितली. मातीच्या प्रकारानुसार ठिबकची निवड करावी.

रुंद वरंबा पद्धतीवर दुहेरी नळीचा वापर केला पाहिजे. ठिबक सिंचन करताना ठिबकची निवड आराखड्यानुसार करावी. ठिबक प्रणालीच्या वापरामुळे पिकामध्ये वापसा नियमित टिकून असतो. कांदा पिकाची लागवड झाल्यानंतर विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे, असे सांगून त्यांनी कंपनीची विविध उत्पादने व कंपनी सेवांबद्दल माहिती दिली. ‘सकाळ- अॅग्रोवन’चे सिनियर एक्झिक्युटिव्ह सुनील रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले. श्री. लोणाळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT