Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Sharad Gadakh : प्रगत तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचणे गरजेचे : डॉ. गडाख

विद्यापीठ प्रक्षेत्रावर निर्मित तंत्रज्ञान गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

Team Agrowon

Akola News : जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक काळात देशातील कृषी विद्यापीठे सर्वोत्तम योगदान देत आहेत. सकस अन्नधान्य, फळे-भाजीपाल्यासह दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि काळसुसंगत शाश्‍वत शेती तंत्रज्ञान संशोधित करीत आहेत.

विद्यापीठ प्रक्षेत्रावर निर्मित तंत्रज्ञान गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी केले.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार नूतनीकरणप्रसंगी ते बोलत होते.

रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून गाव खेड्यांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रसारित होऊन शाश्‍वत शेती आणि संपन्न शेतकरी संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले

या वेळी रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा विभागाचे राज्य समन्वयक मारुती खडके यांनी रिलायन्स फाउंडेशन सध्या १६ राज्यांमध्ये १४१ जिल्ह्यांत कार्यरत आहे.

शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मोबाइल व तंत्रज्ञान वापर करून विविध कृषी विद्यापीठांची शास्त्रोक्त माहिती पोहोचवित आहे.

ऑनलाइन शेती शाळेच्या माध्यमातून जमिनीची पूर्वमशागत ते पीक काढणी तंत्रज्ञान अवगत करून त्याच्या पीक उत्पादनामध्ये वाढ, उत्पादन खर्च कमी करून होणारे नुकसान कसे वाचू शकेल याकडे लक्ष दिले जात आहे.

या वेळी शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे, कुलसचिव डॉ. एस. आर. काळबांडे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, कृषी विषयतज्ज्ञ सचिन मताले, जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT