Dr. B.C. Andhare  Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. B.C. Andhare : जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे : डॉ. बी. सी. अंधारे

Dietary management : जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालय बदनापूरचे सहायक प्राध्यापक डॉ. बी. सी. अंधारे यांनी केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : भारत दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर, मात्र दूध उत्पादकतेत सर्वांत कमी आहे. त्याकरिता जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालय बदनापूरचे सहायक प्राध्यापक डॉ. बी. सी. अंधारे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे कृषी विज्ञान मंडळाच्या ३१८ व्या मासिक मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे कृषी विज्ञान मंडळाचे ३१८ मासिक चर्चासत्र झाले. या कार्यक्रमात डॉ. अंधारे यांनी केले. डॉ. अंधारे म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी अझोला तंत्रज्ञानाचा वापर करून अझोलाची निर्मिती करावी

याचा वापर शुष्क आहार सोबत करून जनावरास प्रथिने व खनिज योग्य प्रमाणात मिळतील व संतुलित आहाराची गरज भागेल. गाईची वासरांची व इतर जनावरांची आहाराचे कमतरता दूर करण्यासाठी चाटणवीट बांधावी.

चारा कुट्टी करून खाऊ घालावा. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन करण्यासाठी बियाणेची निवड व प्रक्रिया याबद्दल माहिती दिली. वन्य प्राण्यांपासून (हरणे, नीलगाय (रोही), रानडुक्कर, माकडे इत्यादी) शेतातील पिकांचे संरक्षण या विषयावर सारंग बोंगाने यांनी वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याच्या विविध जैविक उत्पादनांची माहिती व वापर याबद्दल माहिती सांगितली.

तंकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. अजय मिटकरी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT