Artificial Flower Agrowon
ॲग्रो विशेष

Artificial Flower : प्लॅस्टिक फुलांच्या बंदीबाबतचा मुद्दा संसदेत मांडणार ः खासदार सुळे

Supriya Sule : प्लॅस्टिकच्या फुलांचे हार व गुच्छ स्वीकारणार नाही. संसदेत या फुलांच्या बंदीबाबतचा मुद्दा मांडणार आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Team Agrowon

Pune News : प्लॅस्टिकच्या फुलांचे हार व गुच्छ स्वीकारणार नाही. संसदेत या फुलांच्या बंदीबाबतचा मुद्दा मांडणार आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पोंढे (ता. पुरंदर) येथे बाजारपेठेत प्लॅस्टिक फुलांच्या अतिवापरामुळे सामान्य फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीच येत नसल्याची व्यथा फूल उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली.

यामुळे सुळे यांनी प्लॅस्टिकच्या फुलांच्या बंदीसाठी पुढाकार घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. राजुरी पोंढे ते वाघले वस्ती या रस्ताचे भूमिपूजन व गावातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन खासदार सुळे व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, की बाजारपेठेमध्ये चीनमधून येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर अधिक मूल्य आकारण्याची मागणी करण्याबरोबरच संसदेत प्लॅस्टिक फुलावर बंदी आणण्याबाबतचा विषय मांडणार आहे. यामुळे काही जण नाराज होतील. मात्र माझ्या फूल उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय मी मांडणार आहे.

या वेळी आमदार संजय जगताप यांनी गावातील विकासकामांसाठी ग्रामस्थांकडून केल्या जात असलेल्या पाठपुरावाचे कौतुक करून गावातील उर्वरित विकास कामांसाठी तसेच धनगर वस्तीवरील रस्त्यासाठी देखील आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. विकासकामांबाबत होत असलेल्या श्रेय वादावर त्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.

या वेळी विजय कोलते, सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे पाटील, प्रदीप पोमण, गणेश जगताप, गौरी कुंजीर, सुनीता कोलते, शहाजान शेख, पुष्कराज जाधव, सरपंच छाया सोमनाथ वाघले, उपसरपंच दीपक गायकवाड, सदस्या नंदा वाघले, मंदा लोखंडे, पंकज लोखंडे, माजी सरपंच संपत वाघले, रामदास वाघले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT