Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : इसापूर प्रकल्पाचे पाणी एक डिसेंबरपासून मिळणार

Rabi Season : उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर कालव्याचे पाणी एक डिसेंबर रोजी सुरू करून रब्बीमध्ये तीन तर उन्हाळ्यात चार पाणीपाळ्या सुरू करण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Nanded News : उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर कालव्याचे पाणी एक डिसेंबर रोजी सुरू करून रब्बीमध्ये तीन तर उन्हाळ्यात चार पाणीपाळ्या सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प क्षेत्रातील सर्व लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग एकचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी झाली.

या बैठकीमध्ये १५ ऑक्टोबर रोजीच्या धरणातील ९६४.१० दलघमी (शंभर टक्के) जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत रब्बी हंगामात तीन पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळाली आहे.

प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

रब्बीसाठी पाणीपाळ्या नियोजन

रब्बी सिंचन कार्यक्रम २०२४-२५ चा आवर्तन कार्यक्रम-एक-इसापूर उजवा कालवा इसापूर डावा कालव्यातून १ ते २२ डिसेंबरपर्यंत २२ दिवस, आवर्तन कार्यक्रम दोन साठी कालावधी १ ते २२ जानेवारी तर आवर्तन कार्यक्रम तीनसाठी १ ते २२ फेब्रुवारीपर्यंत २२ दिवसांसाठी राहील. पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT