Farmers March Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought : उर्वरित महाराष्ट्र काय हिरवा आहे काय?

Drought Condition : शासनाने नुकताच राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळाची घोषणा केली. मात्र, उर्वरित महाराष्ट्र काय हिरवा आहे का, असा प्रश्न करीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यशासनावर खरमरीत टीका केली.

 गोपाल हागे

Buldana News : शासनाने नुकताच राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळाची घोषणा केली. मात्र, उर्वरित महाराष्ट्र काय हिरवा आहे का, असा प्रश्न करीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यशासनावर खरमरीत टीका केली.

सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात रविवारी (ता. ५) शेगाव येथून एल्गार रथयात्रा सुरु झाली. संत गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेत या यात्रेला सुरवात करण्यात आली.

सोयाबीन - कापसाला दरवाढ मिळावी. तसेच पिवळा मोझॅक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळावी, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. यानुसार रविवारी (ता. ५) श्रींचे दर्शन घेऊन शेगावातून रथयात्रेला सुरवात झाली.

राज्य शासनाने केवळ ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. इतर तालुक्यांत शासनाला सर्वत्र हिरवेगार दिसत आहे का, असा संतप्त सवाल करीत त्यांनी सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने तातडीने गांभीर्याने घेत पूर्ण कराव्यात, या साठी आता आरपारची लढाई लढणार असल्याचे ते म्हणाले.

ही रथयात्रा बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. रविवारी जलंब- पहुरजीरा, माक्ता, माक्तावाडी, घाटपुरी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, भालेगाव, ढोरपगाव यामार्गे जाऊन काळेगाव येथे मुक्काम राहील.

तर आज (ता. ६) सकाळी ७ वाजता नांद्रा- मांडणी, रोहणा, वर्णा फाटा, कंझारा फाटा, गोंधणापूर फाटा, मांडवा फाटा, शिरसगाव देशमुख, खामगाव शहर, टेंभुर्णा, आवार, अटाळी, गौंढाळा, लाखनवाडा यामार्गे रथयात्रा प्रवास करेल. त्यानंतर मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली अशी ही यात्रा जाईल. गावोगावी शेतकऱ्यांच्या भेटी, बैठका आणि सभा होतील. बुलडाण्यात २० नोव्हेंबर महाएल्गार मोर्चा काढण्याची यापूर्वीच त्यांनी घोषणा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT