Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain: राज्यात थंडी वाढतेय का ? राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट

Weather News : विदर्भ, खानदेशसह नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसा आणि रात्रीही थंडी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे..

Team Agrowon

Cold Season : पुणेः विदर्भ, खानदेशसह नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसा आणि रात्रीही थंडी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे..

श्री. खुळे यांनी सांगितले, की उत्तर भारतात वायव्येकडून पूर्वेकडे मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंजावातांच्या साखळीतून सध्या तेथे थंडी व बर्फ पडत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांसाठी अनुकूल कमी दाब क्षेत्रही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे.

त्यामुळे मध्य प्रदेशाबरोबर जोरदार ईशान्य थंड वारे महाराष्ट्राच्या भू-भागावर ओढले जाण्याच्या शक्यतेमुळे कडाक्याच्या थंडीचा प्रभाव ह्या भागात जाणवणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात पारा अधिक घसरून होणारे महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी किंवा त्याखालची पातळी गाठू शकते, असे वाटते.

मुंबईसह संपूर्ण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मात्र सध्या जाणवत असलेली थंडी ह्याच पातळीत टिकून राहू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र तेथेही थंडी वाढेल, असा अंदाज श्री. खुळे यांनी दिला.

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान साधारण १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास तर दुपारचे कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या आसपास जाणवेल. विदर्भातील पहाटेचे किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसचच्या आसपास जाणवेल. एकंदरीत डिसेंबरच्या थंडीच्या मासिक भाकीतापेक्षा अधिक चांगली थंडी मुंबईसह महाराष्ट्रात जाणवू शकते, असेही खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT