Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : बनावट पावती पुस्तक गैरव्यवहार तपास ‘जैसे थे’

Pune APMC Scam : पुणे बाजार समितीमध्ये एकाच क्रमांकाच्या पावतीवर दोन दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचा गैरव्यवहार समोर आला होता.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बनावट पावती पुस्तक तयार करून पार्किंग शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या लूटीचे प्रकरण दडपण्याच्या ‘दै. ॲग्रोवन’च्या ४ जूनच्या वृत्ताची दखल घेत, बाजार समिती प्रशासनाने पोलीसांकडे तक्रार होती. मात्र या प्रकरणी पोलीसांकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी आम्ही पोलीसांकडे पाठपुरावा करत असल्याचे बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.

पुणे बाजार समितीमध्ये एकाच क्रमांकाच्या पावतीवर दोन दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचा गैरव्यवहार समोर आला होता. याप्रकरणी ॲग्रोवनमधुन दोन्ही पावत्या सादर करून हा गैरव्यवहार उघड केला होता. प्रथम दर्शनी बाजार समितीने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले.

मात्र ॲग्रोवनने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त ४ जू रोजी प्रसिद्धी केल्यानंतर खडबडुन जागे झालेल्या प्रशासनाना बाजार समितीची बदनामी होत असल्याची जाणिव झाली आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये ॲग्रोवनच्या बातमीच्या संदर्भाने ६ जून रोजी लेखी तक्रार दिली.

मात्र अद्याप या प्रकरणी पोलीसांकडून कोणतीही कार्यवाही आणि कारवाई झाली नसल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी बाजार समिती सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले,‘‘ आम्ही ६ जून रोजी बनावट पावती पुस्तक गैरव्यवहाराची तक्रार दिली आहे. याबाबत आम्ही पोलीसांकडे पाठपुरावा करत आहे. याप्रकरणी ठेकेदाराला चौकशीला बोलविले असल्याचे समजते. याप्रकरणी पुन्हा एकदा पाठपुरावा केला जाईल.‘‘

असा आहे गैरव्यवहार

मूळ पावतीवर पन्नास हजारांचा सेस जमा बनावट पावती क्रमांक ४८३९ या पावतीवर २८ मे रोजी संतोष रेणुसे यांच्या एमएच १२ क्यूआर ९३१६ या वाहनाला नो पार्किंगच्या नावाखाली ३२० रुपये शुल्क वसूल केल्याचे समोर आले आहे. तर १० सप्टेंबर २०२३ रोजी ४८३९ या वैध पावती क्रमांकाद्वारे मे सेजल ट्रेडिंग कंपनीने ४४ हजार १९ रुपयांचा सेस बाजार समितीकडे भरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT