Harvester  Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Implements : स्वराजचा ८२०० स्मार्ट कंबाइन हार्वेस्टर सादर

Agricultural implements from Swaraj Tractors : महिंद्रा अँड महिंद्रा लि. अंतर्गत स्वराज ट्रॅक्टर्सच्या कृषी अवजारे विभागाने भारतीय शेतकऱ्यांसाठी कंबाइन हार्वेस्टरची ‘स्वराज ८२०० स्मार्ट हार्वेस्टर’ ही अत्याधुनिक आवृत्ती खरीप हंगामात सादर केली होती.

Team Agrowon

Swaraj 8200 Smart Harvester : महिंद्रा अँड महिंद्रा लि. अंतर्गत स्वराज ट्रॅक्टर्सच्या कृषी अवजारे विभागाने भारतीय शेतकऱ्यांसाठी कंबाइन हार्वेस्टरची ‘स्वराज ८२०० स्मार्ट हार्वेस्टर’ ही अत्याधुनिक आवृत्ती खरीप हंगामात सादर केली होती.

या कापणी यंत्रामुळे खरिपातील भात आणि सोयाबीनची कापणी उत्तम प्रकारे केली जात असून, रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठीही याच यंत्राला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा आशावाद कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

स्वराजच्या मोहाली (हरियाना) येथील संशोधन आणि विकास केंद्रामध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या फिनलँड, युरोप येथील हार्वेस्टर संशोधन केंद्राच्या मदतीने स्वराज ८२०० स्मार्ट हार्वेस्टर विकसित केला आहे.

पितमपूर येथील कारखान्यात सुट्या भागांच्या उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रणा, आधुनिक पेंट शॉप, खास जुळणी लाइन्स व चाचणी सुविधांसह या कापणी यंत्रांचे उत्पादन केले जात आहे.

ताकद, टिकाऊपणा हा ब्रॅंडचा पूर्वापार वारसा पुढे नेतानाच स्वराज ८२०० स्मार्ट हार्वेस्टरमध्ये वेगवेगळ्या पिकांच्या गरजेनुसार अन्य सुविधा देण्यात आल्या आहे. कंपनीअंतर्गत विकसित पर्यावरणपूरक आणि सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेचे इंजिन बसवले आहे. तसेच यंत्रणेमध्ये पुरविण्यात आलेल्या विविध सेन्सरद्वारे ‘इंटेलिजंट हार्वेस्टिंग सिस्टिम’ पुढील देखभालीसाठी देण्यात आली आहे.

त्यामुळे चालक आणि मालक या दोघांसाठी लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग, प्रवास झालेले अंतर, वापरले गेलेले इंधन आणि कापणी झालेल्या एकरांची प्रत्यक्ष माहिती इ. माहितीही मोबाइलवर उपलब्ध होत राहते. परिणामी कामकाज कार्यक्षमता आणि नफा वाढण्यास मदत होते.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ‘फार्म मशिनरी’ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कैरास वखारिया यांनी स्वराजने भारतात कापणी तंत्रज्ञान रुजविण्यात मोलाची कामगिरीविषयी माहिती दिली.

ते म्हणाले, की बुद्धिमान कापणी यंत्रणेबरोबरच नवीन ८२०० स्मार्ट हार्वेस्टर तंत्रज्ञानाचा नवा मापदंड प्रस्थापित करत असून, स्मार्ट आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह्याने कंपनीची सेवा आणि सपोर्ट टीम कापणी यंत्राच्या कामगिरीवर २४ × ७ देखरेख करू शकते. त्याचा फायदा हंगामभर न थांबता यंत्रणा सुरू राहण्यास मदत होईल.

कंपनीची ग्राहकसेवा नेहमीच्या सेवेपलीकडे जाणारी असून त्यात अलर्ट्स, वैयक्तिक गरजेनुसार सहकार्य, रिलेशनशिप व्यवस्थापक आणि अपवर आधारित व्हिडिओ कॉलिंग या सेवांचा समावेश केला आहे.

स्वराज ८२०० स्मार्ट हार्वेस्टरची वैशिष्ट्ये

सीआरडीई तंत्रज्ञानावर आधारित इंटेलिजंट आणि इंधन कार्यक्षम इंजिन. त्यामुळे इंधनाच्या खर्चात प्रति वर्ष ९० हजारांपर्यंत बचत शक्य.

विविध पिकांच्या कापणीसाठी यंत्रणेतील खास कटिंग बार विकसित. त्यात वॉबल गिअर, १८ इंची फिडर अगर, खालून सरकणाऱ्या पट्ट्या, सेफ्टी क्लच यांचा समावेश आहे.

स्मार्ट रिमोट मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग तंत्रज्ञान.

वेग १.२ ते १.३ एकर प्रति तास आणि इंधन कार्यक्षमता ७ लिटर प्रति तास.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT