MIDC  Agrowon
ॲग्रो विशेष

Karjat MIDC : कर्जत एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा; अंतरिम मंजुरी

MIDC Land Acquisition : कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील कोंभळी एमआयडीसीसाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Nagar News : कर्जत तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील कोंभळी एमआयडीसीसाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता दिली आहे.

त्यामुळे आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयडीसीला अंतरिम मंजुरी मिळाल्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

नगर जिल्ह्यातील कर्जत एमआयडीसीचा मुद्दा सातत्याने चांगलाच तापत होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव - खंडाळा भागात एमआयडीसी उभारण्याचा घाट घातला होता. परंतु आमदार राम शिंदे यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जागेत एमआयडीसी व्हावी ही कर्जतकरांची इच्छा आता पूर्ण झाली आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार राम शिंदे यांनी १५ मार्च २०२४ रोजी मौजे कोंभळी - खांडवी परिसरात एमआयडीसी मंजूर करून आणली होती. या जागेची भूनिवड समितीने पाहणी केल्यानंतर तीन जुलै २०२४ रोजी रूपरेषा सर्वेक्षण करण्यात आले होते.

त्यामुळे कर्जत एमआयडीसीच्या निर्मितीला वेग येत एमआयडीसीचे भूसंपादन कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. २ ऑगस्ट २०२४ रोजी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कर्जत एमआयडीसी निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली.

कोंभळी व खांडवी शिवारातील सुयोग्य व समतल असलेले क्षेत्र या एमआयडीसीसाठी निश्चित करण्यात आले आहे. उच्चाधिकार समितीने सर्व तरतुदी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उद्योग विभागाने २९ ऑगस्ट याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

या निर्णयामुळे कोंभळी परिसरातील जागा एमआयडीसाठी आरक्षित झाली आहे. सदर जागेच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आपल्या प्रयत्नातून एमआयडीसीचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT