Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Crop Insurance : डाळिंबासाठी विमा योजना

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : डाळिंब पिकासाठी औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक ,पुणे, उस्मानाबाद ,बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी,अकोला,हिंगोली या १८ अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे.

Team Agrowon

विनयकुमार आवटे

Insurance Scheme for Pomegranate : डाळिंब पिकासाठी औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक ,पुणे, उस्मानाबाद ,बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी,अकोला,हिंगोली या १८ अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

या योजनेतंर्गत डाळिंब २ वर्ष वय पूर्ण असलेल्या उत्पादन देणाऱ्या पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

---------------------------------
भाग घेण्याचा अंतिम दिनांक : १४ जानेवारी २०२४
----------------------------------

शेतकऱ्यासाठी विमा हप्ता
हवामान धोके---विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रती हेक्टर
जास्त तापमान , जास्त पाऊस---१,३०,०००----६,५०० ते २८,६००
गारपीट---४३,३३३ ----२,१६७
---------
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकट ः योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा

जिल्हा ----विमा कंपनी

नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशीम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार--- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली,सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर---- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद--- भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

(Weather News)

शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग
१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी , आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो, बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसुल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे). शेतकरी मृग किंवा अंबिया पैकी एका बहरात भाग घेऊ शकतो.

५) एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.

(ॲग्रो विशेष)

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला ५ टक्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

६) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

७) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT