Crop Insurance Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : खरिपासाठी अकराशे कोटींची विमा भरपाई

Agriculture Insurance : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यापोटी ११२९ कोटी ३७ लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यापोटी ११२९ कोटी ३७ लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. काही तालुक्यात रक्कम वितरित करण्याचे काम सुरु आहे. यातील २६४ कोटी रुपये अग्रिम रक्कम यापूर्वीच दिली असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने गेल्यावर्षीपासू एक रुपयांत पीक विमा योजना सुरु केली. गेल्यावर्षी सुमारे ११ लख ८८ हजार खातेदाराअंतर्गत जवळपास सव्वा पाच लाख शेतकऱ्यांनी ६ लाख ७७ हजार ७५३ हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवला होता.

त्यापोटी विमा कंपनीला साडेचारशे कोटींपेक्षा अधिक रक्कम हप्तापोटी गेली होती तर ३ हजार ३२८ कोटी ७९ लाख ४ हजार ९९२ रुपये विमापोटी संरक्षित झाले होते. एक रुपयांत त्यामुळेखरीप व रब्बी पीक विमा योजनेत शेतकरी सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या वर्षी पीकांचे नुकसान झाल्याने पंचनामे झाले होते.

त्यानंतर सुरवातीला २६४ कोटी रुपयांचे अग्रीण दिले होते. आता एकूण ११२९ कोटी ३७ लाख रुपये विमा कंपनीने विमा भरपाईपोटी मंजूर केले आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे काम सुरु आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. मंजूर रकमेत अजून काहीशी वाढ होऊ शकते असे सांगण्यात आले. शेवगाव तालुक्याला मात्र अंत्यत कमी रक्कम पीक विम्यापोटी मंजूर झाली आहे.

तालुकानिहाय मंजूर रक्कम

संगमनेर १२८ कोटी ९८ लाख

अकोले ४७ कोटी ३६ लाख

राहाता १२१ कोटी २२ लाख

श्रीरामपूर ६९ कोटी ५६ लाख

नेवासा ८७ कोटी ९४ लाख

कोपरगाव ७९ कोटी ५९ लाख

राहुरी १०३ कोटी ३५ लाख

पाथर्डी ७५ कोटी ६४ लाख

पारनेर १२३ कोटी १ लाख

नगर ६५ कोटी ५३ लाख

शेवगाव ९ कोटी ७७ लाख

श्रीगोंदा ४८ कोटी ७८ लाख

कर्जत ९३ कोटी ८५ लाख

जामखेड ७४ कोटी ५१ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT