Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनीची शासनाकडे २३३ कोटींची मागणी

Crop Insurance Company : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२३-२४ अंतर्गत खरीप व रब्‍बी हंगामात मिळून ४९७ कोटी ९३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२३-२४ अंतर्गत खरीप व रब्‍बी हंगामात मिळून ४९७ कोटी ९३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. या मंजूर निधीपैकी २६४ कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. यापैकी २३३ कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पीकविमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामांत पीक नुकसानीची भरपाई म्हणून विमा मंजूर झालेला आहे. यात खरीप हंगामासाठी २५२ कोटी ५१ लाख रुपये तर रब्बीसाठी २४५ कोटी ४२ लाख रुपये असे एकूण ४९७ कोटी ९३ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

मंजूर नुकसान भरपाईपैकी विमा कंपनीने खरिपातील १३८ कोटी ५१ लाख आणि रब्बीसाठी १२५ कोटी २३ लाख रुपये असे मिळून २६४ कोटी ७ लाख रुपये नुकसानभरपाई वितरित केली आहे. विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदी प्रमाणे पीकविमा कंपनीने एकूण प्रिमीयर रकमेच्या सुमारे ११० टक्के नुकसान भरपाई वितरित केली आहे.

पैसे देऊ नका

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीक नुकसानीबाबत तक्रार दाखल केलेल्या विमाधारक शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही. परंतु पीकविमा कंपनी प्रतिनिधींनी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गैरमार्गाने पैशाची मागणी केल्यास तत्काळ कृषी विभागास लेखी तक्रार दाखल करावी.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच २० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी/अवेळी पावसामुळे विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र बाधित झालेले असल्यास नुकसानीबाबतची तक्रार ही रीतसर मार्गानेच दाखल करावी.

Crop Inssurance App किंवा टोल फ्री क्रमांक १४४४७ याचा वापर करावा. टोल फ्री क्रमांकावर संपर्क न झाल्यास पीक नुकसानीची माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका कार्यालयात द्यावी व पोहोच ठेवावी. या व्यतिरिक्त इतर माध्यमांद्वारे तक्रार दाखल करण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT