Agriculture Pumps Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pumps : ‘रोहित्र अन् कृषिपंपांचे नुकसान टाळण्यासाठी कपॅसिटर बसवा’

Crop Irrigation Scheme : कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहक ऑटोस्विच बसवतात. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो.

Team Agrowon

Nashik News : नाशिक ः कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहक ऑटोस्विच बसवतात. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टाळण्यासाठी तसेच सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच टाळून कपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा व चांगला उपाय आहे. कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास कॅपॅसिटरमुळे मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविलेले नाहीत.

बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे.

कृषिपंपास कॅपॅसिटर बसवल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होऊन योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. काही ठिकाणी शेतकरी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावतात.

त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप सुरू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढू शकते. रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT