Pune ZP Election Agrowon
ॲग्रो विशेष

Pune ZP : झेडपीच्या शिक्षण विभागात झडती सुरू

Pune ZP Education Department : शिक्षण विभागातील स्वमान्यता यू-डायस प्रणाली, शिक्षकांची थकीत बिले आणि एकूणच कारभार याबद्दल गेल्या काही महिन्यापासून वारंवार तक्रारी येत आहेत.

Team Agrowon

Pune News : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासंदर्भात सतत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी विभागातील प्रलंबित कामांची तपासणी करण्यासाठी बारा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागातील चांगलीच झडती सुरू झाली असून कामकाजाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

शिक्षण विभागातील स्वमान्यता यू-डायस प्रणाली, शिक्षकांची थकीत बिले आणि एकूणच कारभार याबद्दल गेल्या काही महिन्यापासून वारंवार तक्रारी येत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील वाद, त्याचबरोबर प्रलंबित कामे, शिक्षक आणि संस्थांच्या तक्रारी यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे.

त्याबाबत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांना सक्षम भेटून सर्व प्रकार सांगितला. मात्र, त्यानंतर शिक्षण विभागाची चार तास बैठक घेतली. त्यानंतर सर्व कार्यालयाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चव्हाण यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.२७) सामान्य प्रशासनाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी १२ जणांची नियुक्ती करत शिक्षण विभागातील सर्व कार्यालयाच्या दप्तर तपासणीस सुरुवात केली आहे. त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर रमेश चव्हाण हे काय निर्णय घेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT