Kumar Ashirwad Agrowon
ॲग्रो विशेष

PM Awas Yojana : रे-नगरात कार्यक्रम स्थळाची पाहणी

Kumar Ashirwad : रे-नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १९) नियोजित आहे. त्या अनुषंगाने येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे-नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १९) नियोजित आहे.

त्या अनुषंगाने येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली. कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर परिसरात स्वच्छता राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, रे-नगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार किरण जमदाडे,

रे-नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, ठेकेदार अंकुर पंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकांसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठामागे आवश्यक कॅम्प ऑफिस, ग्रीन रूमची माहिती घेतली.

तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंटची माहिती तसेच येथे लाभार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदीबाबत माहिती जाणून घेतली.

पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या कामाची पाहणी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅड ची जागा योग्य आहे का याचीही त्यांनी माहिती घेतली.

पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभा स्थळाची पाहणी तसेच नागरिक येण्या जाण्याचे मार्ग, पार्किंग व्यवस्थाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

कार्यक्रमस्थळी ४०० शौचालय

रे-नगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून ४०० शौचालये आणून ठेवली जाणार आहेत.

तसेच कार्यक्रमाच्या वेळी व कार्यक्रम संपल्यानंतरही या परिसरात स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे येथील स्वच्छतेबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील तर त्यांच्या अधिनस्त सफाई कर्मचारी ही येथे नियुक्त करण्यात येतील असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim: पीक विमा क्लेम ११० टक्क्यांवर; नांदेडसाठी ३११ कोटींचा भार

Solapur Development Works Issues: तीनशे कोटींच्या विकासकामांना ‘ब्रेक’

Water Scarcity: गढूळ पाण्यावर ग्रामस्थांचा जीव

Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले

Fertilizer Black Marketing: खताच्या काळाबाजाराला घालणार लगाम

SCROLL FOR NEXT